तस तिचा आणि त्याचा प्रेम विवाह होत, खूप प्रेम होतं त्याचं एकमेकांवर. तो थोडा चंचल होता पण ती खूप प्रामाणिक होती . घरांच्या विरोधात जाउन त्याने त्यांनी लग्न केलं होतं . सगळं काही सुखात चालू होत. पण मधेच त्याच्या चंचल मनाने डोक वर काढलं. दोघांची हि जात वेगळी होती. ती तशी दलित घरातून तर हा हिंदू मराठा होतां. त्याच्या सुखाच्या संसारवर जळणाऱ्या काही लोकांनी त्याचे कान भरण्यास सुरवात केली . पण घरातल्यांनी हे त्याचं लग्न मान्य केलं होतं.
त्याचा एक मित्रं जो खूप जवळचा होता त्याला म्हणाला ” अरे तू कस काय लग्न केलस तिच्याशी, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिने तुला शेवटी ती जातच तशी आहे तुला कधी फसवेल कळणार नाहीं ..”
तो अश्या पद्धतीने नेहमी त्याचे कान भरू लागला
मग घरी आल्यावर तिच्याशी भांडू लागला ती विचारी त्याला तू असं का वागतोयेस मग तो म्हणे तुजी जात मला आवडत नाहीं तुज्या वागण्याची , प्रेमाची मला शंका येते . तिला हे सगळे शब्द खूप टोचत होते , तरीही ती गप्पा बसायची तिला वाद वाढवायचा नवता . पुढे त्याच खूप जास्त होऊ लागल . तो तिला मारू लागला. त्याला अचानक त्याच्या जाती बद्दल खूप अभिमान वाटू लागला व तिला तो तिला त्याच्यावरून हिणवू लागला . तिच्या गप्प बसण्याचा चुकीचा अर्थ घेऊ लागला.
एके दिवशी असाच तो घरी आला नेहमी प्रमाणे तिने त्याला पाणी दिलं, तस तो झटकन म्हणाला मला नाहीं प्यायचय तुज्या हातच पाणी . तुम्ही साले उकरड्यावर वाढलेले ..
तिला ते अनावर झालं ती ने पहिल्यांदा त्याचा प्रतिकार करत म्हटलं ” प्रेम करताना , जवळ घेताना नाहीं आठवलं का हे आणि आज अचानक येवढा तिरस्कार का ?
हो आहे तिरस्कार तुमची तीच लायकी आहे . त्याने तिच्या तोंडाला तोंड देत म्हटलं
ठीक आहे, खूप मोठी चूक केली मी तुझ्याशी लग्न करून , प्रेम केलं ना मी चुकलं माझ . अजून नाहीं सहन करू शकत हा अपमान ती घरात गेली तिची बॅग भरू लागली . तो सर्व बघत होता ती असं काही करेल असं त्याला वाटलं नवत , तिला अडवाव असं त्याला वाटलं ही आपण कुठेतरी चुकतोय याची जाणीव ही थोडीफार होत होती .पण अजून ही जातीचा अभिमान भरून होतां त्याच तोर्यात तो तिला म्हणाला ” अगं जा .. पुन्हा येशील रडत माज्याकडे तेंव्हा बघतो तुला …
तिने बॅग घेतली आणि ती जाऊ लागली .
काहीतरी वाजल्याचा आवाज आला . त्याने बघीतलं तिचा मोबाईल ती विसरली होती तों तिला परत करावा म्हणून तो तिथे गेला तिच्या मोबाईल वर एक sms आला होतां तो हि त्याच्या जिवलग मित्राचा .
त्याने ते संभाषण वाचलं .
मित्रं – मी तुज्यावर खूप प्रेम करतो अजून हि .
ती – पण मी नाहीं माझा नवरा माज सर्वस्व आहे भले तो कसाही असला तरी
मित्रं – तो तूजा नवरा , जो आज तुला तुज्या जातीवरून तुला खालची वागणूक देतो
ती- तो कसाही असला तरी तो माजा नवरा आहे आणि तुला त्याच्याबद्दल बोलण्याचा काही हि अधिकार नाहीं कळलं
मित्रं – वेडी आहेस तू तो मूर्ख तुला कधीच खुश ठेउ शकणार नाहीं
ती – खूप झाल आता यापुढे मला sms करायचं नाहीं, मला तुजी मैत्री हि नकोय
आणि त्याचा शेवट चा SMS
मित्रं – अगं तू खूप छान आहेस . प्लिज जर त्याने तुला सोडल तर करशील ना विचार . बोल…
तो एकदम थंड पडला तोच मित्रं जो त्याला तिच्याबद्दल , तिच्या जातीबद्दल त्याचे कान भरवत होतां तोच त्याचा प्रिय मित्र
खूप काहीतरी गमावलय आणि गमावणार आहोत याची त्याला जाणीव झाली
तेवढ्यात ती आली तिने तिचा मोबिले त्याचा हातातून घेतला . तिने त्याच्याकडे एक क्षण बघीतलं पण यावेळी तो तिला वेगळा वाटला
त्याने त्याची नजर जमिनीकडे झुकवली होती, शरीर सैल पडलं होत, ती निघून गेली झप .. झप.. पावले टाकत तो तिच्या पाठमोरी शरीरा कडे पाहत राहिला भरलेल्या डोळ्यांनी बघत .