हॉस्पिटल च्या बाहेर तो हतबल निराश शून्य नजरेने बसला होता. बायको ICU मध्ये व्हेंटिलेटर वर कृतीम स्वाश घेत होती. 40 च्या वयात येक चांगला बिझनेस पर्सन म्हणून त्याने नाव कमवल होत. राहूल नावाचा हा एक यशस्वी गृहस्थ आज आशा सोडलेला हरलेला माणूस होता.
बायकोला covid चे जास्त इन्फेक्शन झाल्यामुळे remdesivir चा फरक पडला नव्हता, तुटवता असल्याने त्याने ते 5 पट अधिक किंमत देऊन विकत घेतलं होतं. त्याला आशा होती तिला बरं वाटेल. ऐक शेवटचा इलाज म्हणून plasma देऊन बघू असे डॉक्टर म्हणाले. सगळीकडे लॉकडाऊन होते कालपासून तो जमेल तिथे ब्लड बँक मध्ये call करत होता. महिती काढत होता हवे ते पैसे द्यायला तो तयार होता पण नाहीच.
ऐक शेवटचा call जो 50 सावा होता त्याने केला.
हॅलो मॅडम प्लाझ्मा हवा होता खूप urgent आहे, माझ्या बायकोचा जीव धोक्यात आहे हवे तितके पैसे घ्या पण मिळेल का ?
माफ करा Mr राहुल पण आम्ही तुमची नाही मदत करू शकणार. अचानक रुग्ण वाढल्यामुळे उपलब्ध स्टॉक संपला आहे आणि सध्या या बिकट परिस्थितीत डोनट करण्याचे प्रमाण कमी आहे. आता यावेळेस मी नाही देऊ शकत विषय पैशाच्या नाही.
असे नका बोलू ५० कॉल केलेत काल पासून काही करा हाथ जोडतो मला please मदत करा
माफ करा आम्हीच याबाबतीत आता काहीच करू शकणार नाही .
त्याने फोन ठेवला हॉस्पिटल च्या रिसे्शनच वर एक फोन आला.
Mr राहुल तुमच्यासाठी डॉक्टराँचा चा कॉल आहे
आलो म्हणत धावत जाऊन त्याने तो फोन घेतला.
Mr राहुल प्लाझ्मा arrange झालं का ? दुसऱ्या बाजूने डॉक्टर होते
नाही डॉक्टर पण काळजी करू नका मी करतोय, होईल आज अरेंज मी काही करून करेन. तुम्ही तिची काळजी घ्या तो घाईत बोलत होता .
Mr राहुल माफ करा तुमच्या बायकोची तब्येत खालावत चालली आहे, उद्यापर्यंत जर प्लाझ्मा नाही मिळाले तर… तुम्हाला कळले असेल असे म्हणून त्यांनी फोन ठेवला.
सगळं काही निराश होत होत, अश्या शुण्यतेत तो सावरत बाकावर जाऊन बसला.
समोर गणपती ची मूर्ती होती तिच्याकडे टक लाऊन तो स्वतःशीच बोलत होता. माझ्या कठीण प्रसंगी जिने मला साथ दिली ती माझी बायको शेवटचे श्वास मोजत आहे. आणि मी यशस्वी बिझनेस person लाखों रुपये बँकेत असूनही काहीच करू शकतं नाही. आज माझे अनेक मोठ्या लोकांशी संबंध असूनही काहीच होत नाहीये, काय करू मी देवा ? कुणाला सांगू ? काय कामाची आहे ही ओळख, पैसा आणि स्टेटस.
राहुल हा अत्यंत व्यवहारी आणि professional व्यक्तीमत्व असणारा माणूस होता. आपण आपले weakness लोकांना का सांगायचे आणि सांगून आपली समाजातली प्रत खराब होते असा विचार करून तो समोरच्या व्यक्तिसमोर नेहमी स्वतःची एक यशस्वी छबी उभी करायचा. आपल्या भावना तो खूप वैयक्तिक ठेवत असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला त्याचाच स्वभावाचे लोक असायची. जी खूप अदबीने बोलायची, व्यावहारिक स्वभावाची खोटे प्रेम आणि हसू चेहऱ्यावर आणणारी. Discipline पाळणारी. राहुल ला या गोष्टीचा अभिमान होता की येका चाळीत राहणाऱ्या उनाड मुलांसोबत फिरणारा मी आज अत्यंत उच्भू लोकांसोबत जगाबद्दल चर्चा करतोय.त्याने त्याचे सर्व जुने contact एकतर जपले नाहीत, नाहीतर काढून टाकले. कधी कुणी भेटल तर न ओळखल्या सारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर असायचे.
आज या सफेद कॉलर च्या लोकांनी फोनवर सात्वन करण्यापलीडे काहीच केलं नाही. आम्ही बघतो, कळवतो, या पलीकडे काहीच नाही. शेवटी त्याने आपल्या whats-app status मला मदत हवी आहे हा मेसेज ठेवला. जे त्याला कधीच आवडत नव्हतं आणि आता ही नाईलाजाने त्याने तो स्टेटस आणि सोबत फेसबुक वर पोस्ट ही टाकली.
कधी अश्रू न काढणाऱ्या राहुल च्या डोळ्यातून येक येक थेंब गालांवर ओघळत येत होते. त्याला एक कॉल आला.
संतोष उर्फ संत्या अरे हा फोन उचलला की फालतू मस्करी करत बसेल ,त्याने त्याचा फोन cut केला.
त्याचा पुन्हा कॉल आला राहुल ने I am busy म्हणून त्याला मेसेज टाकला.
थोड्याच वेळात त्याला मेसेज आला.
राहुल फोन उचल महत्वाचे काम आहे आणि पुन्हा फोन वाजला
वैतागुन राहुल ने फोन उचलला
संत्या बोल काही महत्वाचे काम आहे का ?
मला सांगशील तू कुठल्या अडचणीत आहेस आणि नक्कीच हे फार मोठं संकट असावे
तुला कसे माहीत मी फार मोठ्या संकटात आहे .
राहुळ्या तुझा बालपणीचा मित्र आहे मी, तु खुप अडचणीत असतोस तेंव्हाच तू सांगतो तुझा स्वभाव माहिती आहे मला. गेले काही वर्षे आपण जरी संपर्कात नसलो तरी तुझा हा मित्र तुझ्या प्रत्येक घडामोडी वर लक्ष ठेवून असतो बर का ? पटकन बोल काय झालंय ? मी तोंडाने वाचाल जरी असलो तरी काहीतरी कमावले आहे. बोल लवकर तुझा इगो बाजूला ठेव, तुझा Facebook status बघितला मी.
संत्या च बोलणं ऐकताच राहुल ढसा ढसा फोनवर रडू लागला
संत्या बायको अडमित आहे रे , serious आहे तिला प्लाझ्मा द्यायला सांगितलं आहे आणि तो कुठे मिळत नाहीये मला काहीच कळत नाहीये. काय करू मी ? सैभैर झालो आहे यार ?
*** ( शिवी) तुला हे मला आत्ता सांगतोस . *** (शिवी) वहिनी तिथे बेडवर मरणाशी झुंझतायत आणि तुला इगो महत्वाचा वाटतोय, काय हरमखोर माणूस आहेस तू रहुळ्या. तू घाबरु नकोस तुझा हा मित्र आहे अजून जिवंत. कधीपर्यंत द्यायला सांगितलं आहे ?
संत्या उद्या शेवटचा दिवस आहे ते , माफ कर मला मला , पण कर ना काहीतरी राहुल रडत होता
तू काळजी करू नकोस मी बघतो काय ते वहिनी कडे लक्ष दे बाकीचे बघतो मी address de hospital चा, तू तिथेच आहेस ना .
होय मी इथेच आहे तुला address आणि ब्लड ग्रुप पाठवतो.
राहुल ने फोन ठेवला पण त्याला थोडंसं बर वाटलं खूप दिवसांनी कुणीतरी खुप आपल होईल बोलल, चाळीतले दिवस आठवले. संत्या काय करणार आहे त्याला माहिती नव्हतं. रात्रीचे १२ वाजले होते.
१२.४५ वाजता संत्या आला हातात डबा होता.
त्याला बघताच राहुल ने त्याला मिठी मारली मनसोक्त रडला.
हे घे गरम जेवण आहे काही खाल्ले नसशील, जेवून घे पटकन आणि मी काम चालू केलं आहे काळजी करू नकोस काही जन आहेत. तू जेवून घे मी त्यांनाच भेटून येतो.
पण अरे मी सर्विकडे चौकशी केली कुठेच नाहीये तू कसे करणार आहेस ?
संत्या म्हणाला राहुल जग हे माणसांचे आहे पैसे, वस्तू , सोयी या सगळ्या subjective आहेत. तू माणसांना विचारलं का? आणि कुठल्या माणसांना विचारलं ते ही महत्वाचे.
नाही ज्या माणसांना विचारलं त्यांनी स्पष्ट नाही सांगितले अनेक कारणे दिली राहुल म्हणाला
त्याचा खांद्यावर हाथ ठेवत संत्या म्हणाला म्हणून म्हटल आपण आपण माणसांच्या जगात राहतो. ते जाऊदे ऐक मी फावल्या वेळात अशी सामाजिक कामे करतो आमचे काही ग्रुप आहेत जे या कठीण काळात लोकांना मदत करत आहेत. कसलीही पैशाची आणि कश्याची ही अपेक्षा न करता शेवटच्या लाईन वर त्याने जोर दिला.
राहुल निशब्द होता संत्या ने डबा खोलून दिला आणि तो बाहेर जाणाऱ्या संत्या कडे बघत होता.
सकाळी प्लाझ्मा arrange झालं treatment सुरू झाली. सकाळी संत्या आला नाही प्लाझ्मा donate करण्यासाठी माणूस वेळेत आला. दुपारी राहुल चा डबा ही आला.
बायको मध्ये improvment दिसत होते राहुल ने संत्या ला फोन केला.
बोल धन्यवाद वैगरे बोलू नकोस ती तुझ्या आजू बाजू ल्या असलेल्या जिवंत मुडद्यांची भाषा. वहिनी बर्या होऊदे आणि घरी जेवायला ये तुझा तो पहिल्यांदा मारलेला ब्रँड घेऊन येतो काय ?
राहुल हसायला लागला संत्या तू यार काय बोलू आणि नक्कीच मी येणार आई ला मांदेली फ्राय करायला सांग.
बघ आता कसा माणसांच्या जगात आलास असे म्हणून दोघे ही हसायला लागले.
-अजय ठोंबरे