कथा एका माणसाची ज्याचा मेंदू संगणका द्वारे नियंत्रित केला जातो व त्याचा वापर ऐका कठीण मिशन साठी करण्याची योजना बनवली जाते. ऐक रहस्यमय रोमांचक प्रवास जो तुम्हाला प्रत्येक भागाबरोबर नवीन रहस्य उलगडवेल.
ठिकाण : लाहोर पाकिस्तान
कमी उजेडात ल्या ऐका खोलीत कुणालातरी मारण्याचा आवाज येत होता , मारले जाणार्या धोश्यांचा आवाज फक्त येत होता पन ज्याला मारले जात होते , त्याच्या मात्र काहीच आवाज ऐकायला येत नव्हत .
एका खुर्चीवर एक पिळदार यष्टीचा मनुष्य बांधला गेला होता, त्यांच्या तोंडावर एक जोरात ढोसा बसला , तशे त्याच्या ओठातून अजून एक रक्ताची पिचकारी बाहेर पडली. त्याचा चेहरा मार खाऊन सुजला होता पण जणू काही जाणवत नसल्यासारखे त्याने मारण्याराशी नजरा नजर केली , त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते .
मानणाऱ्या व्यक्तीने कुणालातरी फ़ोन केला
बॉस साला पत्थर हे ये .. मुझे नही लगता ये कुछ जानता है… , या जानता रहेगा तो कुछ बतायेगा . आप बोले तो ख़तम करूँ इसको .
नही… पलीकडून आवाज़ आला
इसको जिंदा रखो और मुर्दा भी
जी बॉस ….
त्याने त्याच्याकडे निरखुन बघितलं आणि तो थोडासा हसला त्याला त्याच्या छातीवर थोडंसं हलल्या सारखं दिसलं . तो तिथे हाथ लावणार तेवढ्यात .
बांधलेल्या व्यक्तीचे भाव बदलले तो हसला आणि म्हणाला
जानना चाहते हो मे कोन हू ? बताऊंगा तो तुम्हें इनाम मिलेगा
त्याचे भाव बदलले होते डोळ्यात डोळे घालून तो बोलत होता
बता कमीने …. मारणारा बोलला
तो हसला वेगळ्याच प्रकारे “ बताऊंगा भाई , मे पाकिस्तानी हू तुम्हारे जैसा एक साधारण आदमी बुरहानपूर का रहनेवाले . तुम जो कर रहे हो वो मे कर चुका हू . मुझे तेरे-से कोई गुस्सा नही, मुझे पता हे की तुम अपनी परिवार के लिये ये सब कर रहे हो
तो हळू हळू श्वास घेत बोलत होता
तूं ज्यादा होशियारी मत कर् समझा.. असे म्हणत मारण्याराने त्याच्या कानाखाली मारली
तो हसला म्हणाला मेरे भाई मेरे पास एक ऐसी इन्फॉर्मेशन हे जिससे तुझे बहुत फायदा होगा. मे
तो मारा जाऊँगा पर तुझे कुछ देना चाहता हू .
असं म्हणत त्याने कुराण च एक श्लोक म्हटलं
त्याचा अर्थ दुसर्-यांना मदत करणे असा होता
आतापर्यंत समोरचा तो पहिल्यापेक्षा नरम झाला होता
“बोल तू क्या बोलना चाहता हे “
“मेरे भाई मे तेरे से अकेले मे बात करना चाहता हू “
तो विचार करू लागला
बांधलेला व्यक्ती म्हणाला
मुजसे डर लगता हे ? आधा तो मर चुका हू .
मे सिर्फ तुझे बताना चाहता हू इससे तुझे बहुत फायदा होगा .
त्याचे डोळे चमकले त्याने बाकीच्यांना इशारा केला तशे सगळे बंदुकधारी बाहेर गेले
हा बोलो क्या बताना चाहते हो
हम्म बताता हू , थोड़ा पानी पिलाओ
तो विव्हळत होता .
मारणाऱ्याला आता त्याची आता दया येऊ लागली त्याने त्याची बंदूक बाजूला ठेवून तो पाणी घेऊन आला
त्याला पाजण्यासाठी त्याच्या तोंडाजवळ पाणी घेऊन आला
एक घोट घस्यात गेल्यावर त्याने डोळे बंद केले , मान आखडली त्याच्या चेहरा वाकडासा केला
आता मरतो वाटतं असं समजून तो त्याला हलवू लागला
भाई क्या हुवा? असं म्हणत तो त्याचे खांदे हलवू लागला
तेवढ्यात त्याने त्याचे डोळे झटकन उघडले आणि तोंडातून त्याने साचलेला पाणी त्याच्या तोंडावर उडवलं .
पाणी तोंडावर उडताच ती व्यक्ती लगेच जमिनीवर पडून तडफडू लागली आणि लगेच थंड झाली
त्याने उरलेला पाणी हाथावरच्या रश्शीवर टाकलं आणि थोड्यावेळाने रशी सडू लागली ..
बराच वेळ आपला म्होर्क्या येत नाही ते बघण्यासाठी सहकारी आत आले , त्यांनी बघितलं कीं खुर्चीत कोणी नव्हतं आणि म्होर्क्या खाली पडला होता त्यांनी त्याच्या नाका-जवळ हाथ लावून बघितलं तो मेला होता .
त्यांना काही कळण्याच्या आत पाठून आवाज आला
Excuse me
बंदूक घेऊन ते मागे वळताच गोळ्यांची बौछाट झाली आणि सगळे एका क्षणात जमिनीवर पडले
तो उभा होता खांद्यावर बंदूक घेऊन चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते त्याच्या छातीजवळ काहीतरी हलकेच हलतं होत.
कोण होता तो ? आणि ते छातीवर काय हलत होत ? तोंडातल्या पाण्याचं रहस्य काय होत ?
क्रमशः
लेखक : अजय ठोंबरे
(पुढील भागाच्या Update साठी आपल्या ई-मेल ID ची नोंद कंमेंट बॉक्स मध्ये करा)
वरील कथा पूर्णपणे काल्पनिक आहे ज्याचा जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काहीच संबंध नाही तो असल्यास त्यास निव्वळ योगा योग समजावा