Devlok Part 1

मुसळधार पाऊस पडत होता प्रितेश धडपडत झाडांमधून वाट काढत कागदावरील नकाशा कडे बघत रस्ता शोधत होता. दोन दिवसांपासून तो या जंगलात तहान भूक विसरून नकाशा वरील पडक्या मंदिराचा शोध घेत होता. येत्या पौर्णिमेच्या अगोदर त्याला तिथे पोहचायचे होते.

मूळ ठिकाणचे उत्तर नकाशाच्या खाली दोन ओळीत लिहिले होते

वृषभ मिरवती शिंगे दोन , त्यातून वाहती ओझळ खुळ खुळ, खोल रुतली पोटात चिर , तिथेच खूनवती पलीकडची खूण.

गर्द झाडीमध्ये ऐका झाडाच्या उंचावर जाऊन प्रितेश सर्विकडे नजर फिरवत त्या ओळी पुन्हा पुन्हा वाचत मूळ ठिकाण शोधत होता.

प्रितेश हा येक अत्यंत गरिबीत वाढलेला महत्वाकांक्षी मुलगा. आयुष्यात सतत वळणा वळणावर त्याने संकटांचा सामना केला. सतत येणाऱ्या संकटा मुले तो खूपच नकारात्मक भावनेत गेला होता.

त्यादिवशी कोर्टात त्याच्या घटस्फोट बद्दल case चालू होती. त्याच्या पत्नीने जी येवढे दिवस गप्प होती case च्या शेवटचा दिवशी त्याच्यावर अनेक नको नको ते आरोप केले. तिने मानसिक छळ, परिवार कडे दुर्लक्ष वैगरे अनेक आरोप केले. तिचे आरोप ऐकून प्रितेश जवळपास तुटून गेला. जीच्यावर आपण प्रेम केले ती असा विचार आपल्याबद्दल करते त्याला याचा खूप त्रास झाला. घटस्फोट मंजूर झाला आणि ७ वर्षाच्या त्याच्या लाडक्या मुलीचा ताबा त्याच्या पत्नीकडे राहिला. जमवलेली रक्कम होत नव्हत सर्व काही बायकोला देऊन आपल्या गोड परीचा पापा घेऊन तो तिथून तडक निघाला. जवळच कशेळी नावाच्या टेकडीवर तो two wheeler घेउन उंच जाऊ लागला.

काय करायचे जगून , लहान पणा पासून सतत च्या प्रॉब्लेम्स मुले मी फार कंटाळून गेलो आहे. माझ्यासोबतच हे सर्व का होते. हे असले फाटके नशीब घेऊन किती जगायचे असे स्वतःची बोलत तो गाडी घेऊन सुसाट वर घेऊन जात होता.

पुढे एका ठिकाणी गाडी पार्क करून तो कड्यावर जाऊ लागला. समोर अथांग डोंगर होत. खाली खोलवर दरी होती आणि गार वारा सुटला होता. त्यांनी खोलवर श्वास घेतला आणि त्या दरीत स्वतःला फेकून देण्यासाठी तो तयार झाला. एक पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात पाठून एक आवाज आला.

बाळा थोड पाणी आणून देतोस का? बाजूलाच झरा आहे.

त्याने पाठी बघितले येक दाढी वाढलेला हडकुला साधू ( वय ७०+ असावे) त्याला पाणी आणण्यासाठी विनंती करत होता.

मरण्याच्या अगोदर काहीतरी पुण्यकर्म करावे त्यासाठी तो साधूला पाणी आणण्यासाठी त्याचा कमंडलू घेऊन झराच्या दिशेने जाऊ लागला.

त्यांनी झर्यातून पाणी भरून घेतले आणि तो साधू जवळ गेला व त्याला ते पाणी पिण्यास दिले.

साधूने त्याला खुणावले व त्याच्या बाजूला बसण्यास सांगितले. साधूने ते अख्ख कमंडलू मधील पाणी पिऊन संपवून टाकले. कमंडलू बाजूला ठेवून साधू नये प्रितेश कडे बघून विचारले.

मला समजेल की तू या निर्जन ठिकाणी काय करतोय ?

साधूच्या प्रश्नाला टाळण्यासाठी प्रितेश इकडे तिकडचे उत्तर देऊन बोलू लागला काही नाही असेच फिरायला आलो होतो बाबा.

तुझे चेहऱ्याकडे बघून तर मला असं वाटत नाही की तू असेच फिरायला आला होतास. साधू बोलला.

मला खरं सांग की तू इथे का आला होतास कदाचित मी तुझी काही मदत करू शकेन.

बाब तुम्ही माझी काय मदत कराल ? माझं नशीब फाटक आहे, माझ्या आयुष्यात कधीच काही चांगल होऊ शकत नाही.

चांगला आणि वाईट ही आपली भावना आहे निसर्गाला फक्त संवेदना कळतात. साधू बोलला
या जगामध्ये चांगलं-वाईट अशी काही गोष्ट नसतं आपण ते कुठला चष्म्यातून बघतोय महत्त्वाच.

तुझ्या आयुष्याला घडवण्याचा पूर्ण अधिकार तुला निसर्गाने दिला आहे तु जे काही आज आहेस त्याला तू स्वतः जबाबदार आहेस तुझे विचार जबाबदार आहेत आणि तुझ्या भावांना जबाबदार आहेत.

मला नाही माहिती कोण जबाबदार आहे पण हे सगळं बदलू शकेल असा माझा विश्वास नाही प्रितेश बोलला

न बदलणारे लोक म्हणजे गुलामच म्हणायचे. ही लोक भावनेमध्ये वाहून गेलेले असतात त्यांचं चंचल मन त्यांना हवं तसं नाचवते, हवं ते करायला लावते. बदल हा एक प्रकारचा विद्रोह आहे. स्वतःच्या मनाशी केलेला विद्रोह, नक्कीच सोपं नाहीये पण अशक्य ही नाहीये.

बाबा तुमचे ज्ञान आणि विज्ञान मला काहीच कळत नाहीये, मला थोड सोप्प करून सांगाल का?

कधीकधी गोष्टी फार सोप्प्या असतात बाळा म्हणूनच कठीण कधीच काही नसतं. ते जिथपर्यंत कठीण असतं, तिथपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल ज्ञान नसते.

मला हे सर्व काही काळनं फार कठीण आता या क्षणाला माझ्या जगण्याला काही अर्थ आहे असे मला वाटत नाही. मला जगण्यापेक्षा मृत्यू जवळचा वाटू लागला आहे. प्रितेश वैतागून बोलत होता.

साधू हलकेच हसला आणि म्हणाला मृत्यू म्हणजेच बदल एका आयुष्यातून दुसरा आयुष्यात केलेला प्रवास, तुला खरंच मृत्यू हवा असेल तर त्यासाठी शरीर सोडाव ही अट नाही. तुझ्या जिवनाला संपव आणि याच शरीरासोबत नवीन जीवनाची सुरुवात कर. नवीन शक्तींचा शोध घे, नवी ज्ञान आत्मसात कर . या जगामध्ये असं खूप काही अशा गोष्टी आहेत तुझ्या आजूबाजूला आहेत तुझ्या आतमध्ये आहेत. ज्याचा शोध तू घेऊ शकतो. मनुष्याने ठरवल तो सर्व काही करू शकतो, सर्व काही बनू शकतो.

ठरवून काय होणार बाबा आम्ही देव थोडी आहोत. प्रितेश बोलला

बाबांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाला होय मनुष्य हा देवही बनवू शकतो.

तुला ते रहस्य जाणून घ्यायचं का ? साधूने प्रितेश ला विचारले

प्रितेश साठी तो खूप मोठा धक्का होता बाबांनी विचारलेल्या प्रश्नाचा नक्की काय उत्तर द्यायचं हे त्याला कळत नव्हतं हा बाबा नक्की खरं बोलतोय कि उगाच काहीतरी आपल्याला सांगतो असं त्याला कुठेतरी वाटू लागलं. तसे आता आयुष्यात काय राहिले आहे बाबा म्हणतोय तसेच नवीन आयुष्याची सुरुवात करायला काय हरकत आहे. आणि जर यात नाही यशस्वी होऊ शकलो तर शेवटी मृत्यू आहेच.

तुम्हीच बोलता यावर माझा विश्वास बसत नाही मनुष्य हा देव होऊ शकतो?

मनुष्य कोणी ही होऊ शकतो तो देव होऊ शकतो राक्षस होऊ शकतो कोणी होऊ शकतो. साधू हसत बोलला

मनुष्याकडे अगणित शक्ती आहेत, खूप वेळा आपल्याकडे असलेला शक्तींचा आपल्याला विसर पडलेला असतो आणि आपण अगदी सामान्य जनावरांचे आयुष्य जगत असतो.

हे सगळं कसं शक्य आहे बाबा मला जाणून घ्यायच आहे.

तुला त्यासाठी एक प्रवास करावा लागेल तु तयार आहेस ?

होय मी तयार आहे बाबा , काय करायचं आहे?

ठीक आहे. बाबा त्यांच्या झोळीतून एक गुंडाळलेला पेपर काढून संदेश च्या हातात देतो.

पेपर वरील जो लक्ष्य आहे एक जुने मंदिर त्या नकाशात दिलेल्या ठिकाणावर पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुला पोहोचायचे तिथून देवलोका कडे जाणारा रस्ता आहे .

जसा तुझा प्रवास सुरु होईल आणि तू तिथे पोहाचशिल तुला हळू हळू सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल.

तू कागदाचा तुकडा फार जुना असतो, कदाचित कित्येक हजार वर्ष असावा. त्यावर एक नक्शा असतो शेवटी खाली दोन ओळींमध्ये मूळ ठिकाण जुन्या मंदिराची माहिती कोड्यात दिलेली असते.

देव लोकाचा रस्ता …. हे कसे शक्य आहे .

अहो साधू बाबा असे म्हणतो, तर बाबा तिथून गायब झालेले असतात.

आजूबाजूला शांतता पसरलेली असते प्रितेश नक्षा व्यवस्थित आपल्या बॅग मध्ये ठेवतो आणि प्रवाशाची सुरुवात करण्याचे ठरवतो.

( पुढच्या भागाच्या Update साठी तुमचा ई-मेल ID कंमेंट बॉक्स टाका )

क्रमशः

लेखक
अजय ठोंबरे

Scroll to Top