तीच Affair

धम्म्म्म…..मेंदू मध्ये काही बिप वाजल्या सारखे झाले. डोळे उघडले आजु बाजूला धुंदक वातावरण होते. बीप बीप आवाज येत होता. समोर कुणीच न्हवते तो एकटाच त्या रूम मध्ये होता. तो हॉस्पिटल च्या बेड वर निश्चल पडला होता. आजू बाजूला असलेल्या भिंती, खुर्च्या, पंखा अस्पष्ट दिसत होते.

पुन्हा त्याला ग्लानी आली डोळे बंद झाले आणि अंधार झाला

वेळ: आदल्या दिवशी सकाळी

सोमवारची सकाळ होती नेहमी प्रमाणे ऋषभ ऑफिस मध्ये वेळेवर पोहचला. त्याचं आज डोकं खूप दुखत होते अनेक विचार मनात येकाच वेळी गोंधळ घालत होते जर तर या शब्दांमध्ये बाऊन्सिंग होत होते. आज सकाळी प्रीती बरोबर त्याचे भांडण झाले होते. या दरम्यान तिला तो खूप काही बोलला. त्याला ते झालेले भांडण आठवत होते

ऋषभ बेड वर येका बाजूला हताश होऊन ऑफिस साठी घाईने तयार होत असलेल्या प्रीती ला उद्देशून बोलत होता.

ऋषभ : मला असे वाटत आपल्यात सगळ संपलय

प्रीती : आश्चर्याने बघून बोलली ” काय ” ? तू असे कधी कधी अचानक काही बोलतो आणि मला खूप त्रास होतो याचा

ऋषभ : चुकीचे काय बोललो, काही दिवसांपासून आपल्यात नीट बोलणे होत नाहीये आणि बाकी संबंध तर लांबच राहील.

प्रीती : अरे मी काही दिवसांपासून ऑडिट च्या स्ट्रेस मध्ये आहे खूप दमते घरात येऊन इतर कामे आवरून थकायला होत तू काही मदत करत नाहीस सकाळी उठून परत जायचं असते. एक तर मी कामाच्या ते टेन्शन मध्ये आणि आणि तुझे हे फालतू विचार …

ऋषभ: तिचे शब्द कापत फालतू.. तुला तर हे फालतू च वाटणार. एखाद्या व्यक्तीची गरज कमी झाली ना की तो फालतू वाटतो.

प्रीती : ऋषभ मला ना अजिबात वेळ नाहीये तुझ्याशी अश्या विषयवार भांडायला. ट्रेन पकडायची आहे हे विनाकारण चे विचार करून मला आणि स्वतः ला त्रास करून घेऊ नको.

प्रीती घाई घाई ने तिची बाग उचलून निघून गेली. ऋषभ तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत होता. त्याला स्वतः बद्दल खूप कमी पणाची भावना वाटून लागली.

ट्रेन मध्ये जात असताना त्याने एका माणसाला कुणाशी बोलताना ऐकल

एक मनुष्य त्याच्या फोन वर बोलत होता
” निघालीस का कितीची गाडी पकडलिस
अच्छा late झालीस आज. तुझा नवरा काही बोलला का काल.
Hmm ok
लक्ष नको देऊस कस काय त्याच्या बरोबर तू राहतेस कळत नाही मला. तू एवढी हुशार आणि सुंदर आणि तो… काय बोलू आता.
हो आत्ता काय आईं वडिलांनी केलंय मान्य आहे मला, पण अशी नाती नसलेली बरी नाही का
संध्याकाळी आहे ना मी, कुठे भेटूया आपण
Ok पवई mall ला ka ? चालेल ना फोन कर मला. भेटू आपण
नक्की Byee सावकाश जा, काळजी घे.”

—————————————————————————————-

ऋषभ ते सगळं ऐकत होता कुठेतरी त्याला ते Relate होत होते. अनेक विचार त्याच्या डोक्यात फिरू लागले.

ठिकाण : ऑफीस मध्ये

हे हृषभ काय झालं ? एकदम शांत शांत

ऋषभ च्या ऑफिस सहकार्याने ने त्याला तंद्री मधून जागे केले.

ऋषभ : अरे शंतनु कधी आलास, मी ठीक आहे, जरा डोके दुखत होते.

शंतनु : Hmm मला असे वाटते काहीतरी गडबड आहे. काही टेन्शन आहे का ? माझ्याशी बोलू शकतोस.

ऋषभ : नाही रे असे काही विशेष नाही.

शंतनु : ऋषभ काही असेल तर बोल. मन हलकं होईल किंवा काही उपाय सुचेल.

ऋषभ: नाही रे तसे काही विशेष नाही एक प्रश्न पडला आहे

शंतनु : बोल ना

ऋषभ : हल्ली working people च्या extra affairs बद्दल एक data बाहेर आला. १० पैकी ५ जणांचे बाहेर Affairs असु शकतात असे लिहिले आहे. तुझे काय मत आहे ?

शंतनु : hmm मला असे वाटते हे शक्य आहे. कारण सहवास हा खूप काही बदलायला लावू शकतो

ऋषभ: म्हणजे कसे काय ?

शंतनु: अरे एखादी स्त्री आणि पुरुष खूप वेळ एकत्र राहत असतील तर त्यांच्या मध्ये आकर्षण तयार होऊ शकते. मग ती स्त्री अथवा पुरुष विवाहित असुदे किंवा अविवाहित.

ऋषभ: hmm बरोबर आहे तुझे

चल खूप काम बाकी आहे बघुया ते. असे म्हणत दोघे जण आप आपल्या डेस्क जवळ गेले.
ऋषभ काम करत असताना त्याच्या डोक्यात शंतनु चे शब्द फिरत होते. प्रीती माझ्याशी हल्ली का अशी वागत आहे तीच काही अफेयर वैगरे असू शकते का वैगरे वैगरे.
तसेच तो मधल्या वेळेत Cheating woman’s च्या वागण्या या वर आधारित ब्लॉग्ज सुध्दा search करुन वाचू लागला.

Lunch time मध्ये त्याने प्रीती ला कधी नव्हे तो फोन केला.

ऋषभ: कशी आहेस प्रीती ?

प्रीती : बोल ना .. थोडी कामात आहे काय झालं

ऋषभ : काही नाही असच फोन केला

प्रीती : आज अचानक रोज तर करत नाहीस

ऋषभ : करू नको का ?

प्रीती : तस नाही रे म्हणजे काय महत्वाचे आहे का ?

ऋषभ : नाही तसे काही महत्वाचे नाही.

प्रीती : ओके मी तुला फोन करू जरा कामात आहे

ऋषभ : ओके ठीक

ही खरंच कामात आहे की उगाच बोलते असे ऋषभ ने स्वतः शी म्हटले आणि फोन ठेवला.

तिचा काही परत फोन आला नाही. घरी जात असताना त्याने तिला फोन केला तिचा फोन व्यस्त होता. तरी परत केला तरी तिचा फोन व्यस्त होता.

त्याला चुकल्या चुकल्या सारखं वाटू लागले. जोरात ओरडावस वाटत होतं , रडावसं वाटत होते. तू अत्यंत तणावात होता. त्याच वेळेस रस्ता क्रॉस करत असताना त्याला डाव्या बाजूने हॉर्न चा आवाज आला ठप्प झालं. अंधार झाला.

( एका बस ने त्याला धडक दिली होती )

—————————————————————————————————————

सद्यस्थिती हॉस्पिटलमध्ये

खूप कष्टाने त्याने डोळे उघडले त्याला आवडणाऱ्या Shampoo चा वास येत होता तसेच हातामध्ये गरमपणा जाणवत होता. त्याला थोडा आता स्पष्ट दिसू लागले होते. त्याने बघितले त्याच्या डोक्याजवळ खांद्याच्या बाजूला प्रीती डोकं टेकून झोपली होती. तिने त्याचा हात तिच्या हातात घेतला होता. खूप वेळ हात हातात घेतल्यामुळे हाताला घाम सुद्धा आला होता व त्यामुळेच त्याला आता जवळ गरम पना जाणवत होता.

तिच्या शाम्पू चा वास जो त्याला नेहमी आवडतो, शंभर टक्के ती प्रीती च होती हे त्याला समजले. त्याच्या हालचाल बघून प्रीतीला जाग आली.

त्याने प्रीती कडे बघितलं तिचे डोळे सुजले होते कदाचित ती रात्रभर झोपली नव्हती. त्याच्या डोक्याला बँडेज होती त्यामुळे त्याची मान त्याला तिच्या बाजूने फिरवता येत नव्हती.

तो म्हणाला प्रीती .. त्याने असं म्हणतच ती ढसाढसा रडू लागली.

ऋषभ तुला कसे वाटते आहे ? तू बरा आहेस ना ? मी खूप घाबरले होते ? तुला काय झाला असते तर मी काय केलं असतं ? मी तुझ्याशिवाय कसं जगू शकले असते?

ती भावनिक होऊन बोलत होती. तो तिच्याकडे बघत होता, तो बघत होता, फक्त बघत होता

प्रीती.. तो पुन्हा बोलला

हा ऋषभ बोल ना काय हवय का तुला काय दुखतंय का तुझं. डॉक्टरांना बोलावू का ?

प्रीती … असे असं म्हणून त्याच्या डोळ्यातून दोन अश्रूंचे थेंब खाली ओघळले.

थोड माझ्याजवळ ये मला तुला काही बोलायचे आहे. तो म्हणाला

ती त्याच्या जवळ गेली त्याचा हात तिने तिच्या दोन्ही हातामध्ये घट्ट पकडून ठेवला व म्हणाली बोल काय बोलायचं आहे

प्रीती… पुन्हा ती आर्त हाक

बोल ना राजा काय बोलायचं. ती हळुवार पणे म्हणाली

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्याशिवाय या जगामध्ये महत्त्वाच माझ्यासाठी काहीच नाही. तो अत्यंत भावनिक होऊन म्हणत होता

होय मला माहिती आहे तुला बोलायची गरज नाही. तू नाही बोललास तरी मला माहिती आहे. आणि माझही तेवढंच तुझ्यावर प्रेम आहे. प्रीती म्हणाली

असं म्हणून गहिवरून तिने त्याला मिठी मारली दोघेही रडू लागले.

काही नाती खूप खोलवर असतात वरून कितीही कोरडे वाटत असतील तरी आत मध्ये न सुकणाऱ्या ओलाव्याने भरलेली असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top