The Seven Habits of Highly Effective People या प्रसिद्ध पुस्तकाबद्दल ( By Stephen Covey ) बोलायचं झालं, तर यात दिलेल्या सात सवयी खूप साध्या असल्या तरीही परिणामकारक आहेत. आपण आज या लेखात या पुस्तकाचे सारांश थोडक्यात समजून घेणार आहोत.
लेखक यांनी आपल्या या पुस्तकात Highly Effective लोकांच्या सात सवयी बद्दल माहिती दिली आहे त्या खालील प्रमाणे मी थोडक्यात मांडण्याच्या प्रयन्त केला आहे. जरी संक्षिप्त स्वरूपात हि माहित असली तरी याची परिणामकारकता अधिक होण्याची अपेक्षा असल्यास पुस्तक पूर्ण वाचण्याचे मी वाचकास आव्हान करेन. खूप वेळा पूर्ण पुस्तक वाचण्यास वेळ काढता येत नसल्याने किमान या महत्वाच्या सवयी आपणास माहित असाव्या म्हणून अत्यंत मोजक्या शब्दात आपणांसमोर ही या छोट्या लेखाद्वारे सादर करत आहे. मराठी वाचकांनी याचा उपयोग करून आपल्या जीवनात बदल करावा अशी अपेक्षा.
सवय : १ प्रोएक्टिव्ह रहा
याचा अर्थ, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी स्वतः जबाबदारी घ्या. परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी आपण त्या गोष्टींना कसे प्रतिसाद द्यायचे, हे ठरवा. त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचे निर्माता बनतो.
जरी परिस्थिती कशीही असली तरी निवडीचे स्वातंत्र्य तुमच्याकडे असते. प्रतिसाद तुम्ही देता ते देण्याचे स्वातंत्र्य तुंम्हाला निसर्गाने दिले आहे. तुम्ही दिलेला प्रतिसाद आणि निवड ज्याला आपन निर्णय पण बोलू शकतो यावर तुमचे आयुष्य घडत असते. म्हणून तुम्ही जे काही आहात त्याला तुमचा प्रतिसाद आणि निवड जबाबदार आहे
सवय २ : शेवटाचा विचार करून सुरू करा (Begin with the End in Mind)
लेखक श्री कोवे सुचवतात की, आपल्या ध्येयांचा स्पष्ट विचार करून, प्रत्येक कृती आपल्याला अंतिम ध्येयाच्या दिशेने घेऊन जाणारी असावी. हा सवयीचा उद्देश म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे.
ध्येय आणि ते ही स्पष्ट ध्येय महत्वाचे आहे कुठल्याही कामाची सुरवात करताना त्याचा शेवट कसा असेल याची स्पष्ट कल्पना मनात तयार असावी. शेवट स्पष्ट असेल तर त्या दिशेने जाणारे रस्ते सहज बनविता येतात तसेच योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
सवय ३ : महत्त्वाच्या गोष्टी आधी करा (Put First Things First)
लेखक श्री कोवे यांच्या मते, आपले कार्य महत्त्वाच्या आणि तातडीच्या अशा दोन भागांत विभागून पाहायला हवे. अशा कामांवर लक्ष द्या ज्यामुळे आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रगती होते, तात्पुरत्या आणि कमी महत्त्वाच्या गोष्टींवर नाही. तसेच यामुळे Time Management उत्तम प्रकारे’होते.
सवय ४ : विन-विन विचार करा (Think Win-Win).
कोवे असे सुचवतात की, आपल्या संबंधांमध्ये दोन्ही बाजूंना फायदा होईल असे विचार ठेवावेत. यामुळे विश्वास निर्माण होतो आणि संबंध मजबूत होतात.
मुळातच विन विन प्रत्येक ठिकाणी असावे व्यापारात, नात्यांमध्ये ज्यामुळे आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत लॉन्ग टर्म Relation मध्ये राहील.
सवय ५ : पहिले समजून घेण्याचा प्रयत्न करा, मग समजून सांगण्याचा (Seek First to Understand, Then to Be Understood)
प्रभावी संवाद साधण्यासाठी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. कोवे सांगतात की, दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास संवाद सुलभ होतो, आणि त्यातून विश्वास निर्माण होतो.
सवय ६ : सिनर्जी साधा (Synergize)
म्हणजे, एकत्रित कार्य करून मोठे परिणाम साध्य करणे. विविध लोकांची मतं, कौशल्ये एकत्र आणल्यास एक नवीन आणि प्रभावी परिणाम साधता येतो. हे एकत्रित प्रयत्न व्यक्तीला एकट्याने साधता येत नाहीत.
सवय ७ : सॉला धारदार ठेवा (Sharpen the Saw)
हे म्हणजे स्वतःची नियमित देखरेख आणि नवनवीन गोष्टी शिकत राहणे. कोवे सांगतात की, शारीरिक, मानसिक, सामाजिक, आणि आध्यात्मिक या चार गोष्टींवर लक्ष केंद्रित करून स्वतःला ताजेतवाने ठेवले पाहिजे. सतत स्वतःला Update ठेवा शिकत रहा.
हे सगळं वाचून वाटेल की खूप सोपं आहे, पण खरंतर यातील प्रत्येक सवय आत्मसात करणं म्हणजे एक साधना आहे. रोज छोट्या छोट्या सवयी लावल्या तरच या सवयींचा खरा अर्थ आपल्याला कळतो. कोवे यांनी दिलेली ह्या सात सवयी फक्त एक मार्गदर्शन नाही, तर यशस्वी जीवनाकडे नेणारं एक बळ आहे.
आपणास हा लेख आवडल्यास नक्की share करावा