खूप वेळा काही क्षणी असे वाटते, आयुष्यात मोठ्या बदलाची गरज आहे. काहीतरी बदलायला हवं जे काही चाललं आहे ते मुळीच मनासारखं नाहीये. मी असे आयुष्य नाही जगू शकत, मला काहीतरी करायला हवं.
तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही तुमच्या मनासारखं आयुष्य जगण्याचा मार्गावर पाहिले पाऊल टाकले आहे, अभिनंदन.
मनासारख आयुष्य जगता येत का ? याच उत्तर हो आहे. तुम्हाला हवं तसे आयुष्य तुम्ही जगू शकता. हे ठरवणे तुमच्या हातात आहे.
पण मग असे का होत नाही ? बदल हवा आहे पण तो कधीच घडत नाही, असे का होते ?
याचे कारण सोप्पे आहे तुम्ही प्रवास सुरू केलात पण जायचे कुठे ? गावाचे नाव काय? वर्णन काय? तिथे जाण्याचे नियोजन काय? हे ठरवले नाही. जर पत्ताच माहीत नसेल तर पोहचणार कसे.
कुणाला आयुष्यात पैशे हवे असतात, मनासारखे काम हवे असते , लाईफ पार्टनर हवा असतो, परिवार हवा असतो असे बऱ्याच काही अपेक्षा असतात. पण त्याच तपशील काय आहे. पैशे हवे तर किती पैसे हवे आहेत? कधी हवे आहेत? Life partner कसा हवा त्याच वर्णन काय वैगरे.
पत्ता अचूक असायला हवं म्हणजे रस्त्यात कुठे चुकलो तरी कुणालाही विचारता येते.
आपलं डेस्टिनेशन कसे ठरवायचे ?
ऐक सोप्पी पद्धत सांगतो रिव्हर्स thinking करा म्हणजे शेवट पासून सुरुवातीकडे वळा. ही खूप सोपी आणि परिणाम कारक टेक्निक आहे. अनेक यशस्वी लोक अशाच पद्धतीने विचार करतात.
तुम्हाला तो भूल भुलैया च कोड माहित आहे का?
सुरुवात केल्यानंतर अनेक ठिकाणी चुकला सारखं होतं किंवा चुकता ही. पण मग जर आपण शेवटच्या पॉईंट पासून सुरुवातीच्या पॉइंट कडे वळलो तर न चुकता कमी वेळेत बाहेर पडू
उदाहरणार्थ
तुमचं लग्न आहे काही दिवसांनी, अजून काहीच तयारी झालेली नाहीये. तुमच्या समोर दोन पर्याय असू शकतात एक तुम्ही लिस्ट बनवायला सुरू कराल आणि जसे जमेल तसे तुमचं लग्न चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न कराल. त्यात तुमचे लग्न 100% चांगलं होईल याची काही गॅरंटी नसेल, तुमच्याकडून चुका होऊ शकतील जसे डेस्टिनेशन फायनल करताना, जेवणाचा मेनू ठरवताना, आराखडा ठरवताना.
दुसरी पद्धत तुम्ही कल्पना करा तुमचं लग्न कसे व्हायला हवे, ठिकाण कसे असायला हवं, लग्नात कुठल्या कुठल्या गोष्टी व्हायला हव्यात, जेवण कसं व्हायला हवे अजून बरच काही तशी तुमची इच्छा आहे. कल्पना करा आणि लिहून काढा त्याची ब्लूप्रिंट तयार करा आणि मग जे तुम्ही ठरवले ते जमवायला सुरू करा शेवटपर्यंत तुम्ही जी कल्पना केली होती तसेच उतरण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला कुठली पद्धत योग्य परिणामकारक वाटते ? अर्थात दुसरी बरोबर ना
सारांश, आपल्याला आयुष्यामध्ये काय हवय ? आपण जे काही करणार आहोत त्याचा फायनल रिझल्ट काय असायला हवा याची कल्पना करा. डिटेल कल्पना करा जेवढी इत्यंभूत माहिती तुम्ही लिहून काढाल तेवढी स्पष्टता तुम्हाला मिळेल.
जर याची व्यवस्थित ब्ल्यूप्रिंट तुमच्याकडे तयार असेल तर ती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल, तुमची चुकण्याची शक्यता जवळपास शून्य असेल आणि वेळ पडल्यास योग्य मार्गदर्शन मिळवून देईल.
म्हणून बदल तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा तुमची इच्छा प्लॅन बनून जन्म घेईल.
लेख कसा वाटला नक्की कळवा , तुमची प्रतिक्रीया नेहमी मला नवीन लिखाणास प्रोत्साहन देत राहते.
धन्यवाद
अजय ठोंबरे