ब्रेन प्रोग्रामिंग भाग २ ( जेंव्हा तो पहिल्यांदा भेटला )

आपल्याला कुणी असा माणूस हवा आहे जो शरीराने मजबूत आणि मनाने दगड असला पाहिजे . तशेच न घाबरणारा , काही गमावण्याची भीती नसणारा . आणि जे योजले आहे ते without any doubt follow करणारा ..

एक अशी व्यक्ती जिला भावना नसतील, हुशार असेल आणि प्लॅन follow करणारी असेल किंवा ती तसेच करेल असा विश्वास ठेवता येईल ...

त्याची नार्को टेस्ट केली त्याच्या ब्रेन मध्ये काहीच तरंगे उठत नव्हती हे खूप विचित्र आहे

२ वर्षा पूर्वी ….. 

ठिकाण  : मुंबई 

मुसळधार पाऊस पडत होता, जो नेहमीच मुंबईत पडतो. स्नेहा त्यांचं पावसाकडे तिच्या office च्या 

काचेतून काहीतरी विचार करत आणि हातातील coffe पीत बघत उभी होती. दिसायला सावलीशी , नाकी डोली रेखीव तीक्ष्ण नजर,  स्नेहा जी एक raw project head होती raw भारताची intellegnt agency ज्यांचे प्रोजेक्ट किंवा मिशन गोपनीय पद्धतीने चालू असतात . तिला तिच्या बॉस चे शब्द आठवत होते 

“मिस स्नेहा एक खूप कठीण आणि महत्वाचा मिशन ची  आखणी आपणास करायची आहे” . स्नेहा चा बॉस Mr चॅटर्जी तिला खूप गंभीरतेने सांगत होता.  

“जी बॉस , मला आनंद आहे कि तुम्ही मी व माझ्या सहकार्यांना या साठी निवडलंत. आम्हाला अश्या मिशन मध्ये काम करायला नक्कीच आवडेल “

“मिस स्नेहा पहिले मिशन समजून घ्या … उगाच घाई करू नका तसेच तो तुम्हाला जमणार असेल तरच हो म्हणा . कारण तो खूप महत्वाचा आणि कठीण आहे जिथे तुम्हाला खूप हुशारीने आणि नियोजित पद्धतीने जीवावर बेतून काम करावं लागेल “. 

“Sir आम्ही या देशासाठीच इथे आहोत जीवाची गोस्ट असेल तर तो इथे येताना कधीच अर्पण केलय तुम्ही मिशन ची माहिती द्या बाकी आम्ही ते यशस्वी करून दाखवू “ निश्चयी मनाने स्नेहा बोलत होती तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता . 

“ Good हेच अपेक्षित होत मला”.  चॅटर्जी थोडेसे प्रसन्नतेने बोलले 

“तुम्हाला माहितीच असेल फ़ैजल शेख” 

“हो” स्नेहा म्हणाली “कुविख्यात underworld don. जो इथून पळून पाकिस्तान मध्ये वास्तव्यास आहे तिथून तो इकडची ब्लॅक कामे चालवतो तसेच दहशतवादी गोष्टीस मदत करतो . पूर्ण जगाला तो हवा आहे “

“बरोबर स्नेहा आणि हेच मिशन आहे” . 

“म्हणजे ? काही कळलं नाही ?” स्नेहा ने प्रश्नार्थक चेहऱ्याने प्रश्न केला 

“मिस स्नेहा मिशन ” गेट इन ” आपण आखणार आहोत त्या भामट्याला आपल्याला पकडायचं जिवंत किंवा मेलेला “. 

हे नक्कीच वाटते तितके सोपे नव्हते हे स्नेहाला माहित होत . एक मनुष्य जो पाकिस्तानातील लाहोर मध्ये सरकारच्या सुरक्षितेत राहतोय त्याला पकडणं ते ही गुप्त पणे अशक्य वाटणे साहजिकच होत. 

“कठीण आहे पण अशक्य नाही “स्नेहा म्हणाली … 

“गुड स्नेहा मला तुमचा प्लॅन हवा आहे येत्या १५ दिवसात” . 

“ओके  बॉस “

वर्तमान

“स्नेहा मॅडम…  “ स्नेहा विचारातून बाहेर अली 

“श्रेयश ..  ये बैस तुज्याशी बोलायचं होतं” 

श्रेयश तिचा सहकारी होता आणि सर्वात विश्वासू 

“बोला मॅडम आपण बोलावलंत “

स्नेहा ने श्रेयश सोबत मिशन share केला 

“फारच कठीण आणि गुंतागुंतीचा मिशन ठरणार आहे अस वाटतंय “तो गंभीर पणे म्हणाला . 

“श्रेयश आपल्या शब्दकोशात अशक्य असं काही नाही” 

“मला अस वाटत आपल्याला कुणी असा माणूस हवा आहे जो शरीराने मजबूत आणि मनाने दगड असला पाहिजे . तशेच न घाबरणारा , काही गमावण्याची भीती नसणारा . आणि जे योजले आहे ते without any doubt follow करणारा” . 

“एस साऊंड गुड श्रेयश पण असा माणूस शोधावा लागेल “ स्नेहाने त्याला उत्तर दिलं . 

“raw मध्ये जे एजन्ट आहेत त्यातून निवडला तर” श्रेयश ने सुझाव दिला 

“चालेल … तू शोध चालू कर तुझं network active कर माणूस भेटल्यावर पुढच नियोजन करता येईल “

ठरल्याप्रमाणे श्रेयश व त्याच्या सहकार्यांनी काम चालू केलं मानस मिळत होती पण जसा हवा तसा 

माणूस मिळत नव्हता . एक अशी व्यक्ती जिला भावना नसतील, हुशार असेल आणि प्लॅन follow करणारी असेल किंवा ती तसेच करेल असा विश्वास ठेवता येईल .दहा दिवस निघून गेले . फोन ची घंटा वाजत होती स्नेहाने फोन उचलला . 

“हो बॉस प्रयत्न चालू आहेत , काळजी करू नका मी ठरल्याप्रमाणे तुम्हाला रिपोर्ट करेन “

स्नेहाला चिंतेने ग्रासले होते या मिशन वर कुणालाही पाठवता येणार नव्हत कारण जर तो फसला तर खूप नुकसान होऊ शकणार होत . 

“हॅलो श्रेयश काही इनपुट” तिने श्रेयश ला फोन केला 

“नाही मॅडम पण प्रयत्न चालू आहेत “तिने नाराजीने फोन ठेवून दिला 

तेवढ्यात तिचा मोबाइल फोन वाजला 

“ताई … “

“हा अपर्णा बोल “ अपर्णा तिची लहान बहीण होती 

“ताई अरे तुला म्हणाली होती ना त्या हॉस्पिटल बद्दल” 

“अरे हो ते वेड्यांचं हॉस्पिटल का ?”

“हो बरोबर तिथे आपल्याला जायचं आहे आपण तिथे काही मदत करणार आहोत” 

खरं तर स्नेहाचा मुळीच कुठे जाण्याचा मूड नव्हता पण तिने तिच्या बहिणीला तस वचन दिलं होत

“ओके .. तू मला पत्ता पाठव” 

ठाण्याच्या त्या वेड्याच्या हॉस्पिटलात स्नेहाने प्रवेश केला.चित्र विचित्र आवाज येत होते ,तिला ते बघून फार विचीत्र वाटत होतं शिवाय तिला त्यांची दया सुद्धा येत होती. प्रत्येकाच्या आजारानुसार वर्गीकरण केल गेलं होत.  एका स्पेशल झोन मध्ये स्नेहाने प्रवेश केला हॉस्पिटलचा अधिकारी सगळी माहिती पुरवत होता एका खोलीत एका 

मनुष्याला स्नेहाने बघितलं . जवळपास तिशीतला तो तरुण असावा उंच दाडी वाढलेली निस्तेज निर्जीव पुतळ्यासारखा तो बसून होता .स्नेहा बराच वेळ त्याच्याकडे निरखुन बघत होती . तो खूप वेळ तसाच बसून होता जणू तो माणूस नसून मातीचा पुतळा असावा . स्नेहाने त्यांच्याबद्दल अधिकाऱ्याशी चौकशी केली . अधिकाऱ्याकडून कळले कि तो गुन्हेगार होता त्याने एक बँक चोरण्याचा प्रयन्त केला होता पण कोर्टात गेल्यावर तो मानसिक रुग्ण असल्याचे कळले तेंव्हा कोर्टाने त्याला इथे इलाजासाठी पाठवले होते . त्याला इथे येउन जवळपास १ वर्ष झालं  होत पण त्याचा आजार मात्र तसाच होता. 

“मला त्या माणसाबद्दल जो वॉर्ड क्रमांक २०६ मध्ये आहे त्याची माहिती हवी आहे डॉक्टर”. स्नेहाने त्यांच्या केबिन मध्ये जाऊन विचारले 

“त्यांचं नाव अजून हि आम्हास कळले नाही त्याला एक विचित्र आजार आहे “ डॉक्टर म्हणाले 

“कुठला आजार डॉक्टर ?”

“तो स्वतः काहीच विचार करू शकत नाही जिथपर्यंत तुम्ही त्याला सांगत नाही he is like human robot “

“पण हे तुम्हाला कस कळलं “ स्नेहाने वाक्य संपता न संपता प्रश्न केला 

“आम्ही त्याला प्रश्न विचारले त्याची नार्को टेस्ट केली त्याच्या ब्रेन मध्ये काहीच तरंगे उठत नव्हती हे खूप विचित्र आहे” डॉक्टर त्यांचा चष्मा पुसत बोलत होते 

“पण मग बँकेची चोरी कशी केली ?”

मिस स्नेहा मी एवढीच माहिती देऊ शकतो 

स्नेहाने आपली पोलीस म्हणून दुसरी ओळखपत्र दाख़वल जे ती इथे असताना बाळगत होती 

“ओके मी सांगतो” असं म्हणत डॉक्टरांनी काहीतरी शोधण्यास चालू केले 

“हो सापडलं “एक लहान डायरी त्यांनी काढली 

“हि बघा हा  आहे चोरीचा formula “

“चोरीचा formula ?”स्नेहाने आश्चर्याने बघितलं 

तिने ती डायरी उघडली त्यात तिला कुणी असं लिहिलेला दिसलं कि कुणीतरी प्रत्येक गोस्ट सांगतोय त्याला आज्ञा करतोय 

स्टेप १

दरवाजा उघड .. वहीत  नोंद कर…..जाऊन waiting मध्ये बस 

स्टेप २ 

केशर कडे जा तिच्याशी बोल मॅडम तुम्ही आज थकल्यासारखे दिसतायत … 

“आणि हे एक इअरफोन मिळालं त्याला bluetooth आणि फोन होता.” डॉक्टर म्हणाले  

स्नेहाने ती डायरी वाचली तिचा चेहरा खुलला 

एक गूढ स्माईल तिच्या चेहऱ्यावर होती 

“एस…  इट्स प्रोग्रामिंग … “

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top