लिहा असे ज्याने तुमचे आयुष्य बदलेलं

काय होईल जर आपल्याला आवडणारे काम आपण करत असू आणि आपल्याला जे हवय त्या दिशेने आपली वाटचाल चालली असेल ?  तसे जगण्याची काही वेगळीच मजा येईल किंवा असे जीवन जगता यावे असे आपल्या नेहमीच वाटत असेल नाही का .

आपल्या आयुष्यात हवं आहे ते मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं पण दुर्दैव असे की जगातील जवळजवळ 95 टक्के लोकांना त्यांना हवे असलेले आयुष्य, काम, लोकं, परिस्थिती कधीच मिळत नाही. हे का होत असेल ? त्याला आपण आपलं खोटं नशीब समजू या की आपला नाकर्तेपणा ?
खुद्द या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता बराच काळ निघून जातो आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणात आपल्याला कळते की त्याचे उत्तर आपल्या उशा जवळचं होते.

मग सगळं हे घडवून आणण्याची सोपी पद्धत काय असेल ?

मुळातच सोप्पा आणि कठीण हा ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टीकोन असतो. कुणाला काही गोष्टी सोप्या वाटू शकतात तर कुणाला काही अगदीच कठीण. आपल्याला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी त्याबद्दल कितपत आवड आहे किंवा त्यात रस आहे यावर ती गोष्ट सोप्पी की कठीण हे ठरत.

यावर विचार करत असताना यशस्वी माणसांच्या सात सवयी या पुस्तकाचे लेखक स्टीफन आर कवी यांचे हे पुस्तक माझ्या वाचनात आले. त्या पुस्तकात मला त्यात त्याबद्दलच्या सोप्पं आणि प्रभावी उत्तर सापडले.

एखाद्या प्रवासाला अंतिम ठिकाण नसेल, किंवा प्रवास आपण कसा करणार आहोत हेच आपण ठरवलं नसेल, तर तो प्रवास कंटाळवाणा आणि त्रासदायक ठरू शकतो. म्हणजेच प्रवासाला निघताना त्या प्रवासाचे अंतिम ठिकाण आणि तो प्रवास आपण कसा करणार आहोत त्याचे नियोजन, जेवढे चांगले आणि ठरलेले असेल तेवढाच प्रवासाचा आनंद आणि त्या ठिकाणावर पोहचण्याच समाधान आपल्याला मिळते.

म्हणजेच कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना त्याचे ध्येय काय असेल हे ठरवणे फार गरजेचं आहे. ज्याला आपण बोलू शकतो ध्येय आणि त्याचे स्वरूप कसे असेल याची थोडक्यात माहिती म्हणजेच ध्येय वाक्य इंग्लिश मध्ये vision statement म्हणू शकतो.

वडिलांचा भूमिकेमध्ये तुम्ही स्वतःला कसे बघता ?
प्रियकराच्या भूमिकेमध्ये तुम्ही स्वतःला कसे बघतात ?
Employee च्या भूमिकेमध्ये  तुम्ही स्वतःला कसे बघता ?
एक नागरिक म्हणून तुम्ही स्वतःला कसे बघता ?
मुलगा भाऊ म्हणून तुम्ही स्वतःला कसे बघता ?

सगळ्याच बाबतीत एखादं वाक्य तुम्ही बनवल पाहिजे.

थोडक्यात आपल्या प्रेयसीसाठी प्रियकर म्हणून आपण काय केलं पाहिजे .कसे वागलो पाहिजे. याबद्दलचे विचार आपण लिहिले पाहिजेत. आणि मग आपण असायला पाहिजे होतो, आणि आहोत या मधल्या फरकाची नोंद करून आपण असायला पाहिजे होतो त्या दिशेने आपला प्रवास सुरू व्हायला हवा. जे आपण असायला पाहिजे होतो त्याची प्रतिमा सतत आपल्या डोळ्यात असायला हवी.

तुम्हाला व्यापार करायची इच्छा आहे एखादा सर्वोत्तम व्यापाराची तुमच्या मनातली संकल्पना तुम्ही लिहून काढा जे तुम्हाला बनायचे आहे. आणि मग कमी पडत असलेल्या बाबींची नोंद करून त्या दिशेने प्रवास सुरु करा. त्या सर्वोत्तम व्यापाराची प्रतिमा प्रवास करताना तुमच्या सतत डोळ्यासमोर असू द्या. त्यासाठी जी तुमची संकल्पना तुम्ही कागदावर उतरलेली आहे त्याला आपण vision statement  म्हणून ती रोज वाचा.  

ध्येय वाक्य ( vision satatement ) हे तुमच्या यशाच आणि तुमच्या हव्या असलेल्या आयुष्याचं ब्ल्यू प्रिंट असेल त्याला सतत तुम्ही जवळ बाळगा आणि काही ठराविक वेळेनंतर त्याच मोजमाप करा.

कसा वाटला लेख कमेंट नक्की करा .

मित्रांनो जगातील थोर विचारवंतांनी आणि यशस्वी माणसांनी ज्या संकल्पना राबवल्या आहेत ज्याचा अवलंब केला त्या अगदी सोप्या शब्दात तुम्हाला थोडक्यात सांगू शकेन हे माझे प्रयत्न आहेत. तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडून यावे अशी माझी इच्छा आहे .

अश्याच पद्धतीच्या नवीन लिखाणाच्या माहती साठी पेज ला लाईक करा किंवा फॉलो करा

धन्यवाद
अजय ठोंबरे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top