समीर चे अंग खूप दुखत होत. डोकं जड झाले होते. डोळे उघडत नव्हते त्याने कसेबसे स्वतःला सावरले हातांचा आधार घेत उठू लागला पण अचानक जे काही त्याला जाणवलं त्यामुळे त्याला झटका बसला.
असंख्य विषारी सापांनी त्याला वेटोळा घातला होता . पहिले तर तो खूप घाबरला एवढ्या सगळ्या हालचाली करून सुद्धा ते साप त्याला काहीच करत नव्हते पण त्यांनी घातलेला वेटोळा अजून आवळला जात होता .
त्याचा मित्र रितेश आणि मैत्रीण मीनल बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडले होते हळूहळू त्यांनाही जाग येऊ लागली ते सुद्धा अडखळत उठू लागले त्यांनाही समीर ला अश्या अवस्थेत बघून धक्काच बसला . ते त्याला सोडवण्यासाठी त्याच्याजवळ जाऊ लागले जसे ते जवळ जात होते तसे ते साप त्यांच्या अंगावर धावून येते होते . त्यांनी खूप प्रयत्न केला पण साप त्यांना त्याच्या जवळ जाऊन देत नव्हते.
समीर खूप धडपड करत होता त्यांच्यापासून स्वतःला सोडवण्यासाठी तो जेवढे प्रयत्न करत होता तेवढा सापांचा विळखा अधिक घट्ट होत होता. कुणालाच काही कळत नव्हते की नक्की या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं.
समीर आपल्याला काहीतरी करावे लागेल. ज्या पद्धतीने तू सापांमध्ये फसलेला आहेस त्याची परिस्थिती बघता कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते समीरचा मित्र रितेश त्याला सांगत होता
मी प्रयत्न करतोय पण मला कळत नाहीये की मी नक्की काय करू समीर जवळपास वैतागला होता.
एक मिनिट समीर … मीनल काहीतरी आठवलं म्हणाली . तुला आठवतं का काही दिवसांपूर्वी एका साधूला आपण भेटलो होतो त्याने तुला पुनर्जन्मा विषयी काही गूढ असं सांगितलं होतं तुला पडणाऱ्या मित्र स्वप्नांबद्दल कदाचित यातून बाहेर पडण्याच्या मार्ग त्याने दिलेल्या माहितीत असेल तु आठव तो काय म्हणाला होता .
समीर आठवू लागला ते प्रत्येक शब्द जे साधूने त्याला सांगितलं होते .
समीरला लहानपणापासूनच अनेक विचित्र स्वप्ने पडण्याचा त्रास होतो. त्याला सतत रोज सापांच्या रिलेटेड स्वप्न पडायचे स्वप्नामध्ये त्याचे संपूर्ण शरीर सापासारखे झालेले वाटायचे आणि तो त्यांचा एक भाग आहे असं त्याला वाटायचं. अशे एकाच प्रकारचे निरनिराळ्या पद्धतीने स्वप्ने त्याला नेहमी पडायचे. त्यांनी यासाठी कित्येक मानसिक डॉक्टरांची भेट घेतली होती . खूप वेग वेगळ्या प्रकारचे उपाय करूनही त्यातून काही बरं वाटलं नव्हतं. एक दिवशी एका पुरातन मंदिरांमध्ये तो गेला होता . ते पुरातन मंदिर फार जुनं होतं तेथील शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतल्यावर जेंव्हा तो बाहेर येत होता . तेव्हा त्याला आणि त्याच्या मित्रांना खूप केस वाढलेला एक साधू दिसला त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तव सगळे जण साधूकडे ओढले गेले . त्यांचा अश्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास नव्हता मंदिर सुद्धा फक्त पुरातन मंदिर आहे ते बघण्यासाठी ते गेले होते. पण साधूची चेष्टा करावी त्याला अनेक प्रश्न विचारावेत त्याचा दांभिकपना उघड करावा या हेतूने ते त्याच्या जवळ गेले. त्यांनी बघितलं साधू समोरच एका झाडाकडे टक लावून बसला होता. तो तसा एकाच एकाच दिशेने खूप वेळ बघत बसल्याचे त्यांना जाणवले. हा साधू नक्कीच वेडा किंवा नाटकी असणार याची खात्री त्यांना पटली . ते त्याच्या जवळ जाऊन उभे राहिले . त्याच्या लक्षात आले की साधू काही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये मग त्यांनी त्याला हाक मारली . साधूला कळले कि आजूबाजूला कोणीतरी उभे आहे त्याने त्यांना जवळ बसण्यासाठी खुणावले तसे सगळे साधू भोवती बसले.
बाबा तुम्ही अशे विचित्र कपडे का घालता ? तुम्हाला नाही आवडत का चांगले कपडे घालावे छान रहावे मीनल साधूकडे बघत बोलली
बाळा मला एकांतवास प्रिय आहे. त्यामुळे एकतर मला एकांतवासात पासून कुणीच दुर घेऊन जाऊ नये तसेच चांगल्या कपड्यांचे , दिसण्याचे याबद्दल मला खाली लोभ नाही. माझे कधीच लक्ष नसते की कुठल्या प्रकारचे कपडे घातले आहेत मी स्वतः मग्न असतो कायम . शरीराचे काही संवेदनशील भाग झाकले जावेत व त्यामुळे इतर लोकांचे मन विचलित होऊ नये तेवढ्यापुरती मी हे कापडाचे तुकडे अंगाला गुंडाळतो तसे म्हणायचे झाले तर मला एकांतवास स्वर्गाहुनी प्रिय आहे.
पण बाबा एकांतवासच का ?
हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे मला एकांतवासात राहून या विश्वातील अनेक गूढ रहस्याचा शोध घ्यायला आवडते.
गूढ रहस्ये ? समीर म्हणाला
होय गूढ रहस्ये हे जग खूप विशाल अनंत आहे याला मोजता येत नाही. यात अनेक रहस्ये दडलेले आहेत याचा शोध मानवजातीला अजून लागायचा आहे.
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अजून बरच काही अस आहे जे मानवाला माहिती झालेलं नाही रितेश म्हणाला .
होय बरच काही साधूच्या चेहर्यावर स्मितहास्य होते.
हा साधू काहीही फेकतोय समीर त्याच्या दोन्ही मित्राला व मैत्रिणीला बाजूला घेत म्हणाला
समीर तसेही आपली रात्रीची ट्रेन आहे आणि हा साधू खूप छान इंटरेस्टिंग बोलतोय खरं खोटं माहित नाही पण ऐकायला काय हरकत आहे मीनल त्याला समजावत होती .
ते सगळे पुन्हा साधू जवळ गेले त्याच्या बाजूला बसले, तसं समीर त्यांना म्हणाला बाबा तुम्हाला असे वाटते विज्ञान मागासलेले आहे.
तसा तो हसला आणि म्हणाला मी कुठे म्हणालो असे काही , मी फक्त एवढंच म्हणालो की अजून बरच काही माहिती करून घ्यायचं आहे.
पण मला असं वाटतं माणसाकडे अवगत असलेल्या तंत्र ज्ञानामुळे तो जगातील कुठलीही गोष्ट माहिती करून घेऊ शकतो नाही का
हो पण सगळ्याच गोष्टी नाही . जसे अजूनही तू तुला पडत असल्या स्वप्नांचा अर्थ शोधू शकलेला नाहीयेस.
सगळ्यांना धक्काच बसला साधूला कसं माहिती की याला अशी स्वप्न पडतात.
कुठल्या स्वप्नाबद्दल तुम्हाला म्हणायचं आहे समीर थोडा गोंधळत म्हणाला.
का तुला माहित नाही मी कुठल्या स्वप्नांबद्दल बोलतोय साधू समीरकडे ताठ नजरेने बघत होता
समीर जवळपास गोंधळेलाच होता तो थोढा अडखळत म्हणाला पण मला तो एक प्रकारचा मानसिक आजार वाटतो.
या विश्वामध्ये प्रत्येक घटनेला आणि गोष्टींना कारण असते बाळा कारणाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही हा निसर्गाचा नियम आहे साधू बोलत होता .
म्हणजे मीनल ने विचारले याचा काही अर्थ असेल .
होय याला पडत असलेला स्वप्नांचा संबंध पुनर्जन्माशी आहे.
पुनर्जन्म सगळे एका स्वरात म्हणाले
होय पुनर्जन्म
हे असं काही नसतं समीर हात झटकत म्हणाला आपण जाऊ या हा साधू मला जरा डोक्याने वेडा वाटतो काहीही बडबडतोय .
समीर या साधूला कसं माहिती पडले की तुला अशी स्वप्न पडतात, नक्कीच हा कोणी साधासुधा साधू नाहीये तुलाच विश्वास बसत नसेल तर एक मनोरंजन म्हणून त्यांचं ऐक यांच्या बोलण्यामध्ये मनात तथ्य वाटते रितेश समीर ला समजावत म्हणाला
बाबा आम्हाला माफ करा पण या कम्प्युटरच्या जगामध्ये पुनर्जन्मावर विश्वास नाही ठेवता येत किंवा तसे काही नसते असे आम्हाला वाटते रितेश म्हणाला
तुमचे काहीच चुकत नाही बाळांनो आपण जी गोष्ट सतत ऐकतो आणि पाहतो तीच गोष्ट आपल्याला सत्य वाटू लागते. त्यामुळे तुम्ही लहानपणापासूनच्या ज्या वातावरणात जगलात जे कानाने ऐकलं आणि पाहिलं त्याच गोष्टीमुळे तुमचा विचारांची जडणघडण झालेली आहे.
पण पुनर्जन्म ही केवळ अंधश्रद्धा आहे की त्याला काही वैज्ञानिक आधार ? मीनल म्हणाली समीर आता शांतपणे ऐकत होता
मी जरी तुला साधू दिसत असलो तरी भ्रामक कल्पना रचणारा भोंदू माणूस नाही या पाठीमागे नक्कीच खूप अभ्यास आणि चिंतन केलेले आहे .
पुनर्जन्म कसे शक्य आहे आणि समीर ला पडणार्या स्वप्नांचा त्याच्याशी काय संबंध असेल रितेश म्हणाला
नक्कीच आहे. साधू पुढे सांगू लागला शरीर हे अनेक गुणसूत्रांनी बनलेले असते अनेक गुणसूत्रे एकत्र येऊन शरीराची आखणी झालेली असते. जेव्हा आपण स्वतःला मी म्हणतो तेव्हा तुम्ही व तुमचे शरीर असे दोन भाग होतात. तुमचे शरीर म्हणजे एखादी वस्तू असून तुम्ही त्याचा तात्पुरता वापर करीत आहात या शरीरामध्ये असताना तुमचे जीवन काळात तुम्ही जे काही ज्ञान घेता अनुभवता त्यावर तुमचा स्वभाव ठरवला जातो, तुमची आवड ठरते.
काही चांगले वाईट करताना त्याच पद्धतीचे गुणसूत्रे किंवा एक प्रकारचे वर्तुळ तुम्ही स्वतःच्या आत्म्या भोवती तयार करता. ज्या वेळेस तुम्ही हे शरीर सोडता तेव्हा तुमचा आत्मा शेवटचे जीवनातील त्रिवं इच्छाआकांक्षांना घेऊन मार्गस्थ होतो व त्यांच्याशी मिळत्याजुळत्या शरीर योनीत प्रवेश करतो. अशाप्रकारे प्रत्येक जीव त्याचा वर्तमानातील जीवना नुसार पुढील जन्माचा मार्ग ठरवत असतो. या निसर्गात असंख्य गुणसूत्रांनी युक्त असंख्य स्वभावाचे शरीरे उपलब्ध आहेत. माझ्या बाळांनो म्हणून तुम्ही वर्तमान जे काही जगता त्यावर तुमचे येणारे कित्तेक भविष्ये अवलंबून असतात जणू तुम्ही जन्मो जन्मी अखंड प्रवास करीत आहात .
खूप इंटरेस्ट आहे मीनल म्हणाले
पण याचा माझ्या स्वप्नांची काय संबंध आहे समीर थोडासा वैतागला होता.
नक्कीच याचा संबंध आहे शांत चित्तेने ऐक सांगतो .
क्रमशः
लेखक अजय ठोंबरे
( वरील कथा पूर्णपणे काल्पनिक असून याचा कुठल्याही जिवती अथवा मृत व्यक्तीशी काही संबंध नाही )