रहस्य पुनः जन्माचे ( अंतिम भाग )

साधू पुढे बोलू लागला

जेव्हा एखादा आत्मा पूर्वीच्या शरीरातील इच्छाशक्तीला घेऊन दुसरे शरीर धारण करतो तेव्हा पूर्वजन्मातील काही गोष्टी नवीन जन्मात त्याच्या स्वभावात आणि विचारात दिसून येतात. खूप वेळा तुम्हाला असे आढळले असेल एखादा मुलगा जन्मजात एखादा गुण घेऊन सोबत जन्माला येतो तर नक्कीच हा योगायोग नसतो तर त्याच्या पूर्व जन्माचं फळ असत.

पण मला पडणार्‍या स्वप्नांचा ह्या सगळ्या गोष्टींशी काय संबंध आहे समीरने त्या साधूला विचारले.

सांगतो बाळा तु पूर्वजन्मी सापाचे शरीर धारण करून जगत होतास. मी जसे तुला म्हणालो जन्मोजन्मी आपण एक प्रवास करीत असतो प्रत्येक जन्मानुसार पुढच्या देहाचा निर्णय होत असतो. त्याचप्रमाणे तुझ्या मागील कित्येक जन्मांचे फळ म्हणून तुला हा मनुष्य देह मिळाला आहे. मनुष्यदेह हा असा देह ज्याला स्वतः बद्दलचा विचार करण्याचा, स्वतःबद्दलचा आत्मभान जागृत करण्याचा अधिकार निसर्गाने दिला आहे. म्हणूनच मनुष्यदेह  सर्व योनीतील सर्वोत्तम देह म्हणून संबोधला जातो.

आतपर्यंत तिघांनाही साधूच्या बोलण्याचा नेमका अर्थ कळत नव्हता.

साधूने त्यांचे भाव ओळखले व तो पुढे सांगू लागला.

समीर जरी तू मानव जन्म घेतला असलास, तरीही ही काही कारणांमुळे पूर्वजन्मातील काही तत्वे तुझ्या वर्तमानातील जन्मात तुझ्या आत्म्यासोबत आली आहेत. आणि म्हणूनच तुला रोज तुझ्या मागील योनीतील म्हणजेच सापांबद्दल ची स्वप्ने पडत असतात जणूकाही तुला ते आपल्याभोवती खेचत आहेत.

अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो निसर्ग आपल्या तत्वानुसार चालते त्यात अशी काही तत्वे असतात जी कधीच बदलता येत नाहीत. तुम्ही जेवढा त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न कराल तेवढेच ती अधिक शक्तिशाली बनतात. म्हणजेच समीरला येणाऱ्या अनुभवांना त्रासदायक नजरेने न बघता त्याचा स्वीकार करायला हवा. जेवढा तो स्वीकार करेन तेवढाच त्याचा त्रास त्याला कमी होईल.

साधू उठला व उठताना म्हणाला अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही करत असलेले विचार एका चुंबकीय शक्तीचे तुमच्या भोवती आवरण तयार करते. ती शक्ती सकारात्मक आहे किंवा नकारात्मक याचा निर्णय पूर्णपणे तुमच्या विचारांवर अवलंबून असते.

म्हणून बाळांनो विचारानं द्वारे तुम्ही या सृष्टीतील अद्वैत शक्तींशी संपर्क करत असता. चांगल्या वाईट शक्ती तुमच्या विचाराने द्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करतात म्हणूनच तुम्ही कुठले विचार करता किंवा तुमच्या मनात कशा प्रकारचे विचार येतात याचा अभ्यास तुम्ही करायला हवा

एवढे म्हणून साधू मंदिराच्या बाहेरच्या दिशेने जाऊ लागला

मला अजूनही माझ्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळालेले नाही समीर शून्य भावनेने म्हणाला.

मागे न वळताच तो बोलला.

तुला तुझा उत्तर नक्कीच मिळेल, जेव्हा एखाद्या अशा प्रकारच्या परिस्थितीत तू स्वतःहून फसशील तेव्हा येणाऱ्या अनुभवातून तुला तुझे उत्तर मिळेल याहून जास्त मी तुला सांगू शकत नाही.

तिघांनी एकमेकांकडे बघितले बरंच काही कळलं होतं आणि नाही सुद्धा. साधूने दिलेली माहिती नक्कीच इंटरेस्टिंग होतीच पण डोकं चक्रवणानरी सुद्धा होती.

वर्तमान स्थिती

समीर तुला काही आठवला का ? रितेश समीर ला त्याच्या विचारांतून बाहेर काढत म्हणाला .

हो त्यांनी सांगितले दोन महत्वाचे मुद्दे एक तत्व मान्य केलं तर त्यांचा त्रास होत नाही किंबहुना ती तत्वे आपलीशी वाटतात आणि दुसरे विचार चुंबकीय क्षेत्रात सारखे काम करतात.

मला कळलं आहे की आता नक्की काय करायचंय ते.

समीरने डोळे बंद केले ऐक मोठा श्वास घेऊन शरीराची हालचाल मंद केली. करून शरीर स्तब्ध ठेवले व त्यांनी स्वतःला विषारी सापांमधलाच कुणी एक असल्याची कल्पना केली. व तो विचार करू लागला आणि मी त्यांचाच एक भाग आहे ते मला काहीच करणार नाहीत तसेच मला तुमचा त्रास होत नसून तुमच्याबद्दल आपुलकी व प्रेम वाटते . तो हा विचार पुन्हा पुन्हा करू लागला.

क्षणार्धात सगळ्या बदलू लागलं समीरच्या शरीराभोवती सापांची पकड सैल होऊ लागली प्रत्येक साप हळू हळू समीर पासून वेगळा होऊन झाडांमध्ये जाऊ लागला.

समीरने डोळे उघडले आणि त्याने बघितलं तो पूर्णपणे मोकळा झाला होता रितेश आणि मीनल ने त्याला लगेच येऊन मिठी  मारली.

माझा विश्वास आहे की तुला यापुढे सापांबद्दल चे स्वप्न पडणार नाहीत मीनल समीरला म्हणाली.

कदाचित असे होईल पण तसे नाही झाले तरी तरी मला आता त्याचा त्रास होणार नाही कारण हे साप मला.माझे नातेवाईक वाटू लागलेत असे म्हणून तो हसू लागला .

हा हा माझ्या सर्प मित्रा घराकडे जायला हवं तुझे असले तरी आम्ही अजुन मनुष्य योनितले आहोत बर का .

तिघे ही पुन्हा हसू लागले व बाहेर असलेल्या त्यांच्या गाडीकडे वळले.

( वरी कथा पूर्णपणे काल्पनिक आहे त्याचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही )

पहिल्या भागासाठी इथे क्लिक करा

https://ajaythombare.in/2020/05/23/लघुकथा-रहस्य-पुनर्जन्मा/

लेखक – अजय ठोंबरे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top