नामस्मरण ऐक विज्ञान

अनेक वर्षांपासून होऊन गेलेले संत महात्मे . आपल्याला सतत सांगत आहेत की नामस्मरण करा.

नामस्मरण ऐक असे माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही जीवनाचे सार समजून घेऊ शकता.

भक्ती चा आधार घेऊन तुम्ही जीवनाच्या उच्च बिंदू कडे पोहचू शकता.

साधारण मानसिकता बघितली की लोक याला देव भोळे पणा म्हणू शकतात. आपल्याकडे काही वेळा अध्यात्माला अंधश्रद्धा समजली जाते.

अर्थातच मी अंधश्रध्देचा निषेध करतो. पण ज्ञानाच्या जोडीने केलेलं अध्यात्म हे नक्कीच कर्मकांड , अंधश्रध्देच्या फार वेगळे आणि जीवनात प्रतेकासाठी गरजेचं आहे.

आज अनेक पुस्तकांमधून सांगितले जाते की जर एखाद्या गोष्टी मध्ये भावनांची गुंतवणूक होते तेंव्हा ती गोष्ट साध्य होण्यास कुणीच अडवू शकत नाही. मग ती एखादी वस्तू मिळवण्यासाठी असुदे किंवा एखादे ध्येय साध्य करण्यासाठी असुदे .भावना खूप महत्वाच्या असतात आणि त्या प्रत्येक गोष्टीत प्राण फुंकू शकतात. भावनांची गुंतवणूक खूप मोठ्या मानसिक शक्तीला जन्म देते आणि जे अशक्य आहे ते करून दाखवते. सोप्पं वाटतंय ना ऐकायला ? पण नक्कीच सोप्पं नाही . भावना या वाटेल तेंव्हा तयार करता येत नाहीत . ते तयार हातात सुप्त मनात . सुप्त मन जणू एखादा जिन जो म्हणतो हुकुम मेरे आका अतिशय शक्तिशाली जो तुम्हाला सर्व काही देऊ शकतो. पण तुम्हाला मागता आले पाहिजे. त्यासाठी त्याच्यावर नियंत्रण असणे गरजेच आहे .

मन हे चंचल आणि खूप शक्तिशाली आहे तुम्हाला वाटत की तुम्ही स्वतंत्र आहात पण हे वाटून तुम्हाला आचर्य वाटेल की तुम्ही २४ तास पूर्ण आयुष्भर त्याचे गुलाम म्हणून जगता . तुमचा त्याच्यावर अजिबात नियंत्रण नाही .आणि त्यामुळेच तुम्ही सुख आणि दुःख च्या जाळ्यात ओढले जाता.

आपण सवयींचे ,मनाचे गुलाम असतो. पण जर हेच सुप्त मन जेंव्हा तुमच्या आदेशात राहील तुम्हाला हव तसे वागेल तेंव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही खरे स्वतंत्र आहात . सुख आणि दुःख पलीकडला अनुभव तुम्हाला घेता येईल. याची ताकत आपल्या थोर पूर्वजांनी ओळखली होती .

ऋषी मुनी यांचा विचार केला की आपल्याला यज्ञाच्या आगीत स्वाह करणारे साधू आठवतात. मित्रानो हे ऋषीमुनी म्हणेन त्यावेळचे वैज्ञानिक जणू असे मला वाटते . ते ऐकांत वासात राहून. सतत चिंतन करून नव नव्या गोष्टीचा शोध लावत व अनुभव घेत . त्यांनी या विषयावर खूप लेखन केलं आहे . आणि निरनिराळे मार्ग सांगितले आहेत . पण यातील बरेशचे मार्ग सामान्य माणसांना समजणे कठीण म्हणून संतांनी , सद्गुरूंनी ऐक उत्तम मार्ग लोकांना सांगितला तो म्हणजे नामस्मरण.

नामस्मरण अजुन परिणामकारक झाले जेंव्हा त्यात संगीत गुंफले गेले आणि त्याला भक्ती चा मोहक रंग चढला. वाह भक्ती म्हणजे प्रेम आणि भावनांचे वादळ.भक्तिमय नामस्मरणात तुमच्या मनाची इच्छा असतानाही तो कुठेच जाऊ शकत नाही . अशे हे सुप्त मन तुम्हाला भावनांच्या उच्च पातळीवर नेऊन ठेवतो .आणि म्हणते हुकुम करो मेरे अाका.

जेंव्हा आपण नामस्मरण करतो व हळु हळु त्यात रमु लागतो तेंव्हा आपले मन,  शरीर नामावर केंद्रित होते .जस सूर्यप्रकाश केंद्रित केल्यावर कागदाला जाळू शकतो .तसेच हे केंद्रित मन आपल्याला योग साधनेतील उच्च पातळी कडे प्रवास चालू करते .

या प्रवासात मग अनेक भावना , अनुभव  तयार हातात. जेंव्हा तुमचे मन केंद्रित होते तेंव्हा सकारात्मकता तुमच्या विचारत आपोआप भरून येते. त्यासाठी वेगळे पुस्तक वाचण्याची गरज नाही . फक्त कृतज्ञात व्यक्त करून तुम्ही ब्रह्मांडातील शक्तीला आपल्याकडे ओढता . मग अश्या कर्त्याचे सतत नाम घेऊन काय होत असेल विचार करा. नाम कुणाचे घ्यावे असा काही ठोस फॉर्म्युला नाही . देव म्हणजे आपल्यातच फक्त नामा वाटे आपण त्याला जागृत भावनेत आळवतो असो.

नाम म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजे सृष्टी. नामाच्या सतत स्मरणाने सृष्टीच्या चक्राशी आपण एकरूप होऊ लागतो व हळु हळु निसर्ग ही सृष्टि आपल्याला प्रवासात मार्गदर्शन करते . थोडक्यात येकदा कां प्रवेश मिळाला की पुढचे शिक्षण ही शाळा ठरवते .पण प्रवेश मिळवण्यासाठी मंन एकाग्र होणे गरजेचं आहे आणि मन हे नाम स्मरणा मुले एकाग्र होते .

हा झाला अध्यात्मिक भाग पण मानसिक स्थेर्याता , शारीरिक संतुलित यासाठी नामस्मरण खूप महत्वाचे ठरते .

आधुनिक जगात जवळपास ८० % व्याधी या मानसिक ताणामुळे तयार होतात. मानसिक ताण हे चंचल अनियंत्रित विचारांमुळे तयार होते . विचार मनामध्ये तयार होतात म्हणून या शक्तिशाली मनाला काबू करण्यासाठी नामस्मरण हे एकमात्र टूल आहे असे मी मानतो .

सुरुवात कशीही करा . भावना नसली तरीही ऐक वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्हाला जमेल तसे एखादे नाव सतत घेत रहा . हळु हळु तुम्हाला आवड तयार होईल , सवय होईल आणि पुढचा मार्ग तुम्हाला घेणारे नामच दाखवेल.

धन्यवाद

लेखक : अजय ठोंबरे

गुरुदेव दत्त.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top