तिचा वाढदिवस

[ आणि त्या रात्री बेड वर झोपताना त्याला तिचा वाढदिवस आठवला , तिच्या प्रत्येक वाढदिवसाला तो छान surprise द्यायचा . सगळ्या गोड आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या . ती त्याच्या कॉलेज ची मैत्रीण होती आणि नंतर प्रेयसी झाली … ]

ही गोष्ट आहे रमेश ची ऐक ३५ वर्षाचा युवक ऐक वर्षा पूर्वी त्याच लग्न झालं होतं .

लॉक डाऊन मध्ये घरीच असल्यामुळे नवरा बायकोने साफ सफाई चा बेत काढला. दिवस भर काम केल्यामुळे बायको थकून लवकर झोपी गेली . रमेश शी जवळपास झोपणार तेवढ्यात त्याला चटकन काहीतरी आठवलं .

” अरे ऐक मिनिट उद्या तिचा वाढदिवस आहे ”  तो उठून बसला बायको गाढ झोपली होती. त्याने तारिक पुन्हा बघून कन्फर्म केलं. ”

अरे हो मी विसलोच ” त्याने मोबाईल मध्ये जुन्या आठवणींचे फोटो काढले आणि सगळे फोटो तो चेहऱ्यावर छान स्मित आणून बघू लागला.

” समीक्षा ला मी पहिल्यांदा बघितल आणि जवळपास हरवलो होतो. खूप सुंदर दिसली होती तिच्या निळ्या ड्रेस मध्ये तेंव्हा . मला कधीच वाटलं नव्हतं की आम्ही एकमेकांवर येवढं प्रेम करू” .
रमेश त्याच्या आठवणीत रमून गेला ..

” पावसात ऐकाच छत्रीत भिजताना ती खाली बघून उगाच लाजत राहायची मला खूप आवडायचे ते, मग मी तिला रोज dairy मिल्क द्यायचो तिला ही ते चॉकलेट खूप आवडायचं छान होते दिवस ते.”

” तिचा वाढदिवस खूप खास असायचा प्रत्येक वाढदिवसाला मी तिला काहीतरी suprise द्यायचो, ती मला बोलायची रमेश तुला कसं सुचत रे.. पण तिला ते खूप आवडायचं तिच्या वाढदिवसाची तयारी मी ऐक महिना अगोदरच करायचो . “

रमेश जुन्या आठवणीत स्वतःशीच हसून बोलत होता.

” आम्ही नेहमी सिग्नल जवळच्या हॉटेल मध्ये जायचो तिथे तिला ती लेमन विथ अद्रक चहा खूप आवडायची. “

त्याने मोबाईल मधून त्या हॉटेल चे फोटो शोधून काढले .

” खूप दिवस झाले जवळपास वर्ष तिकडे जायला मिळालंच नाही आणि ऐक महिना अगोदर प्लॅन करणारा मी तिचा वाढदिवस जवळपास विसरलोच कसं असतं आयुष्याचं ना “

तो स्वतःवर हसला त्याला थोडा राग ही आला.

” पण मग आता काय करायचं बाहेर सगळं बंद आहे मी काहीच करू शकत नाही.. छे यार … मला आता झोपच येणार नाही . तिचा उद्या वाढदिवस आणि मी काहीच करू शकत नाही “

त्याची चलबिचल झाली त्याला टेन्शन जाणवायला लागलं.  तो बाहेर गॅलरी मध्ये आला खूप वेळ फेरे मारल्यावर त्याला चटकन काहीतरी सुचल आणि तो झोपी गेला.

सकाळचे ७ वाजले होते समीक्षा नियमित वेळेत उठली बाजूला चहा चां कप होता त्यावर ऐक कागद होता त्यात लिहिले होते ऐक घोट घेऊन बघ तुला काहीतरी आठवेल.

ती हसली आणि चहाचा ऐक घोट घेतला

अरे यार मस्त लेमन चहा विथ अद्रकं माझी आवडती पण …

समोरून रमेश आला हातात कागदाने बनवलेलं गुलाबाच फुल होत.

” माझ्या प्रिय बायको ला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा  “

तिने प्रेमाने त्याच्याकडे बघितले ohh माझ्या लाडका नवरोबा त्याला बेड वर बसून जवळ येण्यास खुनवल आणि त्याला मिठीत घेतल.

तो तिला म्हणाला मग कशी वाटली माझी स्पेशल चहा ” लेमन चहा विथ अद्रक्”

{ मित्रानो कशी वाटली गोष्ट कमेंट करा आणि आवडली असेल तर शेअर करा .}

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top