तिचा रुसवा

समिधा : मी म्हणाले होते तुला, तुला नीट ऐकायला येत नाही का ? परत जावे लागेल बाजारात “

समिधा योगेश ( तिचा नवरा ) वर खूप चिडून बोलत होती कारण होत फक्त दूध विसरल्याच.

योगेश : समिधा त्यात येवढं ओरडण्याच काय कारण आहे हरकत नाही जातो मी परत.

योगेश तिला समजावत म्हणाला

समिधा : नको बाबा परत तुमचीच आई बोलेल की मला काही कळत नाही नवऱ्याच काय पडलं नाही.

ती भांडी आपटत बोलत होती .

योगेश आणि समिधा दोघे ही नोकरी करणारे जोडपे येरवी त्यांची भेट फक्त संध्याकाळची आणि रविवारची .

सोबत योगेश ची आई आणि ऐक ६ वर्षाची मुलगी असा छोटा परिवार .

लॉक डाऊन मुले काही दिवसांपासून दोघे ही वर्क फ्रॉम होम .

योगेश ला काही कळत नव्हतं नक्की समिधाच काय बिनसलंय. काही दिवसांपासून तिची चीड चीड फार वाढली होती. तिला कामामुळे तर तान आला नसेल ना ? तो स्वतः उत्तर शोधत होता . पण नेहमी ती काम करतेच काय कारण असेल .

रात्री झोपताना त्यांनी समिधाला विचारले

योगेश :  समिधा काय झालंय ?
समिधा : कष्याबद्दल बोलतोय तु ?
योगेश : नाही तू हल्ली खूप चीड चीड करत आहेस .
समिधा : का? तुला काही बोलू ही शकत नाही का मी?
योगेश : तस नाही पण तू उगाच राग राग करत आहेस
समिधा : बरोबर आहे तुला उगाच वाटेल किबहूना मी केलं उगाच ना तसे ही कधी कधी मला माझी किंमत शून्य वाटते या घरात .

अस म्हटल्यावर तिला रडू कोसळलं

योगेश : अरे समिधा काय झालंय तुला ? तुझ वागणं मला खरंच कळत नाही . तुला समजणं फार कठीण माझ्याकडून काही चुकलय कां? आईशी भांडण झाले का ?

समिधा : जाऊदे सोड … ( अस म्हणून ती दुसऱ्या बाजूने कुशी करून झोपून गेली )

खूप वेळ योगेश तसाच बसून होता. प्रश्नाचं उत्तरं त्याला काही मिळत नव्हतं .
काय झालं असेल भांडण तर कुणाशीच झालेलं दिसलं नाही मला.

त्याने मनाशी काही ठरवलं आणि तो झोपला.

सकाळचे ७ वाजले समिधा नेहमीच्या वेळी उठली तिला किचन मधुन काहीतरी आवाज येत होता बाजूला बघितलं तर योगेश नव्हता

ऐरवी ९ च्या अगोदर डोळे न उघडणारा आज गेला कुठे तिने स्वतःशीच म्हटलं .

ती उठली अर्ध झोपेत किचन मध्ये गेली

योगेश : hey good morning samidha .

समिधा : काय आहे हे काय करतोयस इथे ?

योगेश : काही नाही माझ्या लाडक्या बायकोसाठी चहा तयार केला आहे आणि amalet सुध्दा , बर आज मी तुला सगळ्या कामासाठी मदत करणार आहे . सांग काय करायचं आता .

समिधा ला हसू आले आणि ती त्याच्या कुशीत शिरली . त्याला घट्ट मिठी मारली
योगेश ला कळलं नाही नक्की झालंय काय . काल रागावून झोपलेली आज चक्क माझ्या मीठीत .

तिने त्याच्या हाता मधून फ्राय पॅन घेतला आणि गाला वर हळूच चिमटा घेऊन बोलली

समिधा : माझ्या लाडक्या नवरोबा माझ्यासाठी हेच खूप आहे कमीत कमी तू  माझा विचार करतोस याची जाणीव मला खूप काही देऊन जाते.

योगेश : हे बरं आहे तुम्हा बायकांना समजून घेणं बुआ फार अवघड.

समिधा : तुला नाही कळणार पण अशे सुखद धक्के आम्हाला आवडतात.

दोघे ही हसायला लागले . कदाचित योगेश ला काही अंशी उत्तरं मिळाल .

मित्रानो कशी वाटली ही लहान गोष्ट. अभिप्राय कळवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top