ती सतत त्याला फोने करत होती तो फोने उचलत नव्हता , एक महिना झाला तो नाहीं भेटायला आला आणि नाहीं त्याने फोन केला.असं अचानक काय झाल होतं आणि मी अचानक इथे बेड वर कशी आली . तिला काहीच कळत नव्हतं .ती आपल्या आई ला बोलत होती आई मला साहिल कडे चला ना प्लिज मी नाहीं राहू शकत त्याच्या शिवाय. आई आणि बाबा काहीच बोलत नव्हते .
ते तिला गोंजारायचे . तिला समजवायचे . बाबा पण रात्रभर तिच्याजवळ बसून राहायचे . तिला बेड वरून हलायची परवानगी नव्हती .ती नुसतं त्याच्या आठवणींत रहायची . तिला ते शेवट चे क्षण आठवत होते .
” जो पहिली बार जब हम मिले ….. गाणं खूप जोरात चालू होत दोघं हि खूप मजेत होते बाईक भरदाव वेगानं महाबळेश्वर ला जात होती ते खूप खुश होते . कारण आज ते घरातून पळून आले होते . जवळच एका धाब्यावर ते जेवायला थांबले रात्रीचे ०७.३० वाजले होते . श्वेता त ने साहिल चा हाथ आपल्या हाथात घेतला होता . ती त्याच्याकडे एकटक बघत होती .तो म्हणाला अशी काय बघतेस . ती बोलली साहिल मी आज तुला सर्वच देऊन टाकलाय तन, धन, मन , ईजत . मी माज्या आई बाबांना सोडून आलेय तुज्यासाठी . हो मग तो बोलला. प्लिज मला सोडून नाहीं जाणार ना कुठेच .
अगं वेडी आहेस का? हा साहिल तुझाच आहे पूर्ण पने . बोले तो तन मन धन.
आज रात्री आपण एकटेच एका रूम मध्ये . हम तुम एक कमरे मे बंद हो ….. तो हसत बोलला
चल चावट काय पण … ती हसू लागली
अरे पण . खरं सांगू आई मिस माय डॅड
अगं ओक आपण त्यांना समजाऊ काळजी करू नकोस .
अस झाल तर खूप छान होईल ..
“यार तू अभी मूड खराब कर रही हे जाऊदे ” असं म्हणत तो रुसला
अरे साहिल माझ्या बच्चू अरे मेरी जान .अस म्हणत ती त्याला लाडाने समजू लागली
मग ते दोघ निघाले . भरदावं वेगात . तो खूप खुश होतां. कधी एकदा रूम वर पोहोचतोय असं त्याला झाल होतं
तो ताशी ८० च्या स्पीड ने गाडी चालवत होतां .
आणि तेवढ्यात … तेवढ्यात समोरून मोठा ट्रक आला , तो गोंधळाला तोल गेला आणि धप्प…………….
ती अचानक जागी झाली . खूप घाबरली होती. आज जवळ पास कुणीच नव्हतं कुठे गेले होते सगळे. कशीतरी तिने जवळच्या पाण्याची बाटली घेतली . त्याच झाकण स्टील च होतं ती तो उघडणार तेवढ्यात तिला त्या झाकणात विचित्र दिसलं . ती घाबरली . पण तिने नीट बघितलं तो तिचा चेहरा होता . तो अर्धा काळा आणि विचित्र दिसत होतां. ती अचानक रडू लागली . तला सगळ्या प्रश्नाची उत्तर सापडली होती. तिला आई हवी होती. ती जोर जोरात आई बाबा ओरडू लागली . सिस्टर धावत आली . तिने विचारल कुठे आहेत सगळे . ती म्हणाली आई ऍडमिट आहे तिने तू बरी होण्यासाठी ७ दिवस निर्जल उपवास केला होतां त्यात तिचा बी पी लो झाला आहे .
तिला भरून आलं ती सिस्टर ला म्हणाली . माज्या आई बाबांना सांगा . आई बाबा मी तुमचीच आहे आणि तुमीच फक्त माझे आहात.
– Aj