शरीर हे विचारांच्या पटलावर चालते मी तुम्हाला जे सांगतोय ते माझ्या मेंदूत विचारांच्या तरंगा मुलेच . विचार म्हणजे एक oprating सिस्टिम चा भाग असतात, जे तुमच्या सुप्त मनात साठवली जातात आणि वेळेनुसार , वातावरणा नुसारते जागृत मनात विचारा मध्ये परिवर्तित होऊन , शरीराला कार्य करायला भाग पाडतात . शरीराची हालचाल त्याच्या result असतो…
बरेच निर्णय सुप्त मन घेत असते, तुमच्या नकळत पण त्याला तुम्हीच विकसित केलेले असत .its result of your all long activities . या case मध्ये त्याचे सुप्त मन deactivate झालं आहे . त्यामुळे त्याचे जागृत मन दिलेल्या कमांड ला सुप्त मन समजून शरीराला आदेश देत आहे आणि शरीर तस वागत वागत आहे…
टेबलावर जेवण वाढलं होतं . स्नेहा च लक्ष वेगळ्याच विचारात अडकलं होत
“ताई काय चाललंय कसला विचार करतेयस ? “अपर्णा म्हणाली
“काही नाही तू जेव” भानावर येत स्नेहा म्हणाली .
झोपताना लॅपटॉप वर ती brain प्रोग्रामिंग या विषयाबद्दल search करून त्याबद्दल माहित काढू लागली .
ब्रेन प्रोग्रामिंग म्हणजे माणसाचा घडलेला स्वभाव ती एक blog वाचत होती . मुळातच माणूस आज जसा जगतो , वागतो ते त्याच्या आतापर्यंत च्या घडलेल्या गोष्टीचा प्रभाव मुळेच . लहानपणापासून घडणाऱ्या गोष्टी , आजूबाजूची माणसे आणि प्रत्येक गोस्ट ज्याच्याशी त्या व्यक्तीचा संबंध आला आहे . त्याच्या विचारांचं किंवा डोक्याचं By default झालेलं ते प्रोग्रामिंग असत . आपल्या सुप्त आणि जागृत मनाचा त्यात फार मोठा भाग असतो .
कित्येक लेख त्यावर तिला इंटरनेट वर सापडत होते त्यामुळे थोडं गोंधळायला झालं. अचानक तिच्या मनात डॉक्टर खान यांची आठवण आली . ते तिच्या अनेक प्रोजेक्ट मध्ये कामाला आले होते. शिवाय ते एक undercover एजन्ट हि होते, ते त्या विषयात पारंगत आणि खूप माहिती असणारे होते.
“अरे हा …” तिने चुटकी वाजवली
डॉक्टर खान माझ्या लक्षात आलं नाही ते मला मदत करू शकतात .
तिने मोबाइल वरून फोन लावला “ हॅलो श्रेयश उद्या तू ठाणे मेंटल हॉस्पिटल मध्ये जा आणि ….” तिने फोन वर त्याला एक काम दिल.
आता तिला थोडं हलकं वाटत होत light बंद करून ती बेड वर पडली .
—————————————————————————————————————————–
ठिकाण : डॉक्टर खान यांच्या कार्यालयात
“ हॅलो मिस स्नेहा” डॉक्टर खान यांनी तीच स्वागत करत म्हटलं .
“मला आनंद आहे कि तुम्ही माझी आठवण काढलीत ,बोला मी काय मदत करू शकतो” डॉक्टर खान नम्र पणे म्हणाले
“धन्यवाद डॉक्टर तुम्ही नेहमीच मला अडचणीत मदत केली आहे/ आणि नक्कीच यावेळी सुद्धा तुम्ही मला यातून बाहेर काढाल. “
“हो हो नक्कीच आणि माझं ते कर्तव्य आहे “
दोघांनी एकमेकांकडे बघून smile केली
तिथं पर्यंत चहा टेबलावर आला होता त्यांनी शिपायाला थोडा वेळ कुणालाही आतमधे न सोडण्याची ताकत दिली
“डॉक्टर तुम्ही ते रिपोर्ट बघितले का ?” तिने गंभीर होत म्हटलं
“हो मी बघितले, हि खूप कॉम्प्लिकेटेड आणि लाखोंतून एक अशी होणारी केस आहे. कुठल्यातरी मानसिक आघाताने मनुष्य अश्या शून्य विचार झोन मध्ये जातो, आणि तिथे तो अगदी विचार-हीन परिस्थितीत राहतो .. म्हणजे बघा आपले शरीर हे विचारांच्या पटलावर चालते मी तुम्हाला जे सांगतोय ते माझ्या मेंदूत विचारांच्या तरंगा मुलेच . विचार म्हणजे एक oprating सिस्टिम चा भाग असतात, जे तुमच्या सुप्त मनात साठवली जातात आणि वेळेनुसार , वातावरणा नुसार ते जागृत मनात विचारा मध्ये परिवर्तित होऊन , शरीराला कार्य करायला भाग पाडतात . शरीराची हालचाल त्याचा result असतो “.
“Oho हे खूप इंटरेस्टिंग आहे” स्नेहा आश्चर्य चेहरा करून म्हणाली
“आणि बर का स्नेहा तुम्हाला जाणवत नसलेले बरेच निर्णय सुप्त मन घेत असतं, तुमच्या नकळत पण त्याला तुम्हीच विकसित केलेले असत. Its result of your all long activities . या case मध्ये त्याच सुप्त मन deactivate झालं आहे . त्यामुळे त्याचे जागृत मन दिलेल्या कमांड ला सुप्त मन समजून शरीराला आदेश देत आहे आणि शरीर तस वागत वागत आहे .”
“ओक असं आहे का “स्नेहाने होकारार्थीक मुद्रेने मान हलवली .
“या इकडे “अशे म्हणत डॉक्टर स्नेहाला , त्या विचित्र ३० वर्षीय माणसाकडे घेऊन गेले ज्याला स्नेहाने श्रेयश ला डॉक्टर खान कडे आणायला सांगितलं होत .
“बघा तुम्ही आता”
डॉक्टर खान याने एक ब्लूटूथ इअरफोन त्याच्या कानात लावला ‘
ते त्याला instruction देऊ लागले
“उठून उभे रहा’ तशी ती व्यक्ती उठून उभी राहिली
“पुढे चालू लागा’ ती चालू लागली
“थांबा” ती थांबली
“उजव्या बाजूची टाचणी उचला “त्याने तसेच केलं
“बोटावर टोचा” त्याने टोचलं
रक्त आलं पण त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते
“पाठी चालत या …. थांबा … खुर्चीवर बसा “
डॉक्टरांनी सिस्टर ला बँडेज लावण्यास सांगितले .
“आता कळलं का ?”त्यांनी स्नेहाकडे बघत म्हणाले
तिचा आ वासला होता बापरे हे आचार्य कारक आहे
पण तिच्या चेहऱ्यावर आनंद होता
“एस… मला हेच हवय मिशन यशस्वी होणार”
“श्रेयश … श्रेयश” ती ओरडू लागली
“एस मॅडम” श्रेयश धावत आला
“आपल्या खास लोकांना बोलवा मिशन ची आखणी करायची आहे लवकर आजच काम चालू करू “
“जी मॅडम” तो कामाला लागला
तिच्या मनात विचार घुमत होता
“ Man in robot “
क्रमश :