रिलेटिव्हिटी चा सिद्धांत, योग, आनंदी राहण्याचा सोप्पा मार्ग, एकाग्रता या सगळ्यांचा संबंध एका बेसिक तत्त्वाशी आहे चला जाणून घेऊया

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडला ज्याला law of gravity असे ही म्हणतात त्यानंतर विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन ऐतिहासिक रित्या बदलला. खासकरून Universe आणि Space बद्दल

रिलेटिव्हिटीचा सिद्धांत म्हणजे नक्की काय ?

थोडक्यात आपण सर्व ग्रह, आकाशगंगा अगदी सर्व एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत म्हणजे जसे काही येका अदृश्य चादरी वर आपण पसरलेले असल्यासारख.

आता अध्यात्मक रित्या या कन्सेप्ट ला समजून घेऊया

जसे की आपलाच माहितीच आहे की वायू पासून कणांची निर्मिती झाली कणांपासून पासून ग्रह तयार झाले ग्रह मध्ये जसे पृथ्वी इतर गोष्टी तयार झाल्या पाणी, झाडे,मनुष्य वगैरे. म्हणजे तुम्ही अवकाशातून जर पृथ्वीच्या दिशेने प्रवास केला तर जडत्व अधिक त्रिव होत जाते असे समजेल. ज्याला आपण थोडक्यात गुरुत्वाकर्षणाची ताकद ( power of gravity) समजू. तुम्हाला जर अवकाशात फेकलं तर तुम्ही स्वतःला हलके समजू लागाल आणि जसे जसे तुम्ही पृथ्वीच्या दिशेने ओढले जाल, तसे कसे तुमच्या मध्ये जडत्व येत राहील. जसं तुम्ही पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला आणि जसे तुम्ही पृथ्वीच्या दिशेने अधिक जवळ जाल तसं तुम्ही अधिक जडत्वाच्या दिशेने प्रवास करत राहा.

जर Bird Eye दृष्टीकोनातून या बाबतीत विचार केला तर आपण वरून खालच्या दिशेने प्रवास करत आहोत असं समजेल. म्हणजेच अध्यात्मामध्ये पातळ नावाची जी कन्सेप्ट आहे ती या खालच्या दिशेने अधिक जडत्वाच्या दिशेने केलेला प्रवासाची कन्सेप्ट असे मला वाटते. त्याच्या विपरीत जेव्हा तुम्ही वरच्या दिशेने प्रवास कराल तेव्हा तुमचं जडत्व कमी होऊ लागते.

आपण असं म्हणतो की जडत्व कमी होते किंवा अवकाशात गेल्यानंतर तुमच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही कनेक्टेड नाही आहात. रिलेटिव्हिटी चा सिद्धांत प्रमाणे तुम्ही या ब्रह्मांडामध्ये कुठे असलात तरी या ऊर्जा नावाच्या चादरीवर कनेक्टेड असता.

मग योग याबाबतीत काय रोल निभावते

तुम्ही जर योगाबद्दल शांतपणे खोलवर विचार केला तर योगाचा दुसरा अर्थ आहे शून्य भावनेत जाणे. शून्य भावनेत जाणं म्हणजे गोष्टी होऊन देणे किंवा त्यांच्या परिणामाचा प्रभाव आपल्यावर न पडुन देणे जणू त्याच्या बाबतीत कुठलीच आसक्ती न ठेवणे. जेव्हा घडणाऱ्या घटनांना तुम्ही शून्य भावनेमध्ये बघता त्यावेळेस तुमची त्यांच्याप्रती असलेली ओढ किंवा आसक्ती उरत नाही याचा रिझल्ट असा होतो की त्या घटनातून होणाऱ्या प्रभावाचा तुमच्यावर काही फरक पडत नाही. त्यातून तुम्हाला आनंदही होत नाही आणि दुःखही होत नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण उत्तम योगी कसा असावा याबद्दल असे वर्णन करतात ” जो योगी कुठलाही परिस्थितीत दुखी होत नाही किंवा सुखी होत नाही सदव्य विरक्तीत असतो तोच खरा योगी म्हणून गणला जातो.”

योग आणि त्याचा ब्रम्हांडाशी असलेला संबंध

जर तुम्ही आत्मा या संकल्पनेवर विश्वास ठेवता तर पुढील माहिती तुम्हाला योग्य वाटू शकेल. आत्मा थोडक्यात या विश्वात पसरलेल्या Devine Energy चा एक अंश आहे. आपल्या शरीरामध्ये आत्मा इंद्रियांनी नियंत्रित केलेल्या बुद्धीद्वारे चालत असलेल्या शारीरिक व्यवहारांमध्ये जखडला जातो. थोडक्यात पुनर्जन्म हा तुमच्या मृत्यूच्या वेळी तुमच्या व्यक्त झालेल्या भावनांचा निकाल असतो. हे वरील वाक्य माझे स्वतःचे नसून अनेक दर्शनीक लोकांनी याबाबत केलेल्या अभ्यासाचे फलित आहे. म्हणजेच आपण अनेक विचारांमध्ये किंवा आयुष्यात जगत असलेल्या अनेक आसक्ती मुळे जन्मोजन्मी त्यात जखडले जातो. आपल्याला जडत्वापासून वरच्या दिशेने प्रवास करायचा असल्यास या अश्या बंधनापासून मुक्त होणे गरजेचे आहे आणि त्यास योग मदत करते. किंवा गीतेमधील भक्तीयोग हाही सुद्धा एक प्रभावशाली मार्ग आहे.

भक्ती योग चा अर्थ आहे आपला आयुष्य भगवंताच्या चरणी समर्पित करणे व उत्तम कर्म करीत राहून फळाची अपेक्षा न करणे. ज्यावेळेस आपण फलो विरहित कर्म करतो त्यावेळेस आपण कर्म बंधनात अडकत नाही कारण त्यातून तयार होणाऱ्या रिझल्ट चा आपल्या आनंद आणि दुःखावर काही परिणाम होत नाही.

कर्मयोग प्रमाणे कर्म करीत राहणे हे आपल्या हातात असून फळ हे आपल्या हातात नसते म्हणून उत्तम कर्म करीत राहणे हे आपल्याला दिलेले कर्तव्य असून त्या कर्माप्रती आनंद राहणे हा कर्मयोग होय.

या सगळ्या प्रकारात योगी म्हणजे कर्मविरहित जीवन जगणे नसून धर्मानुसार नुसार मिळालेली कर्मे फळविरहित अपेक्षणे करत राहणे असा होती. धर्म म्हणजे तुम्ही मानता तो धर्म नाही. तुम्हाला स्वभावानरूप, पारिवारिक पटला मिळालेली कर्म. धर्म अत्यंत मोठा विषय आहे त्यावर आपण नंतर कधीतरी बोलू

ज्यावेळेस आपण उत्तम योगी होतो म्हणजेच योग कुठल्या प्रकारचा करावा हा पूर्णपणे आपला निर्णय असून तो आपण व्यवस्थित केल्यास तथाकथित बंधनापासून हळूहळू विरक्ती किंवा शून्याकडे प्रवास सुरू करतो. आणि ही पहिली सुरुवात असते की आपला प्रवास हा खालील असलेला जडत्वाकडून वर सुरू होतो.

या सगळ्यांचा आनंदी राहण्यावर काय प्रभाव पडतो ?

आनंद आणि दुःख म्हणजे भावनांचे विविध स्तर असतात. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या की आपल्याला आनंद होतो आणि आपल्या मनाप्रमाणे गोष्टी नाही झाल्या तर आपल्याला दुःख होतं. तथाकथित आनंद किंवा दुःख हे बाहेरील घटनांचा प्रभाव असतो असे मी समजतो. ज्या अर्थी बाहेरील घडणाऱ्या घटनांना आपण पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही त्या अर्थी होणारा आनंद व दुःख याच्यावरही आपलं नियंत्रण नसतं. पण एक उत्तम योगी ज्याचा बाहेरील घडलेला घटना प्रति शून्य भाव असल्यास त्या घटनांतून तयार होणाऱ्या प्रभावाचा त्या योग्यावर काही परिणाम होत नाही. जेव्हा तो अत्यंत विरक्त आयुष्य जगतो अशा वेळेस कुठल्या भावनेत राहणं याचा निर्णय तो घेऊ शकतो. त्याचा आनंद त्याचं दुःख हे त्याच्या अंतर्गत सिलेक्शन वर असतं आणि म्हणून आनंदी राहण्याचा दुखी राहणार हे सर्व परी तो ठरवू शकतो. ज्यावेळेस आपण जडत्वापासून विरक्तीच्या दिशेने प्रवास सुरू करतो अशा वेळेस कर्माच्या सिद्धांताचा नियम आपल्याला लागू होत नाही म्हणजेच आपली इंद्रिय आपल्या भावना हे आपल्या नियंत्रण असल्याकारणाने बाहेरील घटनांचा प्रभाव आपल्या भावनेवर होत नाही तसेच आपली एकाग्रताही अबाधित राहते. जेव्हा तुम्ही उत्तम योग करता अशा वेळी तुम्हाला तुमच्या अनुमतीशिवाय कोणीही विचलित करू शकत नाही.

या लेखात आनंदी राहणं, योग आणि त्याचा वैज्ञानिक संबंध याबाबत मी सोप्या भाषेत माझे मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये काही सुजाव असल्यास आपण मला कळवावे तसेच हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुमचे मत मांडावे.

तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमुळे भविष्यात असे अनेक लेख लिहिण्याचे प्रस्थान मला मिळत राहील

लेखक- श्री अजय ठोंब

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top