सकारात्मक विचारांची ( Positive Affirmation ) सवय अशी शक्ती तयार करू शकते जी तुम्हाला म्हणेल हुकूम मेरे आका.

आयुष्य कधीकधी फार कठीण वाटू शकते गोष्टी मना सारख्या होत नाहीत सतत अडचणींचा सामना करावा लागतो किंवा सतत अश्या परिस्थितीत आपण स्वतःला बघतो की जिथे आपल्यासाठी सगळंच नकारात्मक असते. पण तुम्हाला माहिती आहे का सकारात्मक विचारांची ताकद तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा सामना करण्यास मदत करू शकते.

आणि ते कसे शक्य आहे चला समजून घेऊया

सकारात्मक विचार ( Positive Affirmation ) म्हणजे नक्की काय ?

सकारात्मक विचार म्हणजे थोडक्यात कधी कधी आपण स्वतःला बरे वाटण्यासाठी स्वतःशीच म्हटलेले काही वाक्य असतात. सकारात्मक वाक्य म्हणजे स्वतःवर विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि असलेल्या परिस्थितीत सकारात्मक राहण्यासाठी मदत करते. जसे हे स्वतःला सांगण्यासारखे आहे की मी हे करू शकतो, मी बलवान आहे, सर्व काही चांगलं होणार, आहे इत्यादी.

ते कसं कार्य करते ?

सकारात्मक विचार Law of Attraction नियमा नुसार एक उत्तम आणि छान परिस्थिती तयार होण्यासाठी लागणाऱ्या इंधनासारखे आहे. Law of Attraction असं म्हणत की तुम्ही जर चांगलं म्हणत असाल, विचार करत असाल आणि त्यावर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच ते प्रत्यक्षात तसेच होते. जेव्हा आपण विश्वास ठेवतो की चांगल्या गोष्टी होतील तेव्हा चांगल्या गोष्टीच होतात आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो की वाईट गोष्टी होणार आहेत तेव्हा वाईट गोष्टी होतात. हे येका जादू सारखे आहे ते पूर्णपणे आपल्या मनावर आणि असलेल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते.

Law of Attraction म्हणजे काय आणि ते कसे काम करते त्याच्याबद्दल असलेले विज्ञान हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे त्यावर आपण वेगळा आर्टिकल मध्ये बोलू.

सकारात्मक विचार करण्याचा सराव कसा करावा याबद्दल जाणून घेऊया

तुमचे शब्द निवडा

तुम्हाला चांगले वाटते असे सकारात्मक विधाने निवडा जसे मी आनंदी आहे, मला आवडते, मला हे जमणार आहे वगैरे.

पुनरावृत्ती पुनरावृत्ती पुनरावृत्ती

तुमच्या आयुष्यातील असलेले ध्येय किंवा इच्छा यानुसार तुम्ही त्या बाबतीत सकारात्मक विधाने तयार करा. जसे तुम्हाला अमुक नफा होणार आहे किंवा होत आहे त्याबाबतीत रक्कम ठरवली असल्यास अधिक चांगले कारण ते specific होते. तुमचं तुमच्या जोडीदारासोबत असलेली नातं अधिक चांगलं होत आहे किंवा ते कश्याप्रकारे असेल याबद्दलचा विचार वगैरे. अशी कल्पना आणि त्याला जोडून बनवलेले स्टेटमेंट रोज सकाळी संध्याकाळी डोळे बंद करून स्वतःशी रिपीट करून बोला.

कल्पना करा

तुमचे डोळे बंद करा आणि तुम्हाला हवे ते जीवन जगत असल्याचे चित्र पहा आनंदी यशस्वी किंवा प्रिय असणे कसे वाटते याची कल्पना करा, त्याचा अनुभव करा. अशी सकारात्मक विधाने आपल्याला अधिक शक्तिशाली करण्यास मदत करतात.

सकारात्मक रहा

चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा आणि नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गावर येत आहेत यावर विश्वास ठेवा

अध्यात्म्याच्या दृष्टीकोनातून हे कसे कार्य करते

संतांनी संत संगतीत राहण्याचा सल्ला आपल्याला नेहमी दिला आहे. संत संगत म्हणजे उत्तम विचार करणाऱ्या लोकांच्या सोबत राहणे उत्तम विचार करणाऱ्या लोकांच्या सोबत राहण्यामुळे आपले विचार तसेच होतात आणि विचारामुळे आयुष्य घडते.

तसेच अध्यात्म मध्ये याबाबत एक सोपा मार्ग सांगितला आहे.

परमेश्वर जो आपला पिता आहे तो आपल्याबद्दल चांगलाच विचार करतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला हवा व आपल्या आयुष्यात नेहमी चांगलेच होणार आहे असा विचार आपण प्रत्येक वेळी करत राहावा. हा सुद्धा सकारात्मक विचार करण्याचा अत्यंत सोप्पा आणि इफेक्टिव प्रकार आहे.

म्हणून सकारात्मक विचार म्हणजे अशी शक्ती आहे ज्याद्वारे तुम्ही कल्पना करू शकाल त्यावर विश्वास ठेवू शकाल आणि ती परिस्थिती किंवा वस्तू प्रत्यक्षात येऊ शकेल. म्हणजेच ती शक्ती तुम्हाला जणू म्हणत असते  हुकूम मेरे आका.

या लेखात सकारात्मक विचार हा विषय सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. याबाबतीत आपले मत नक्की कळवा ज्यामुळे पुढील लेखात याबाबत आम्ही अधिक चांगली माहिती सादर करू शकू.

लेखक – श्री अजय ठोंबरे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top